राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्व उमेदवार, पक्ष प्रचार सभा करत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षाचे नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अश्या पार्श्वभूमीवर वरून सरदेसाई यांनी टाईम महाराष्ट्राला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा त्यांनी केला आहे.
टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली आहे. यावेळी त्यांनी वरुण सरदेसाईना सवाल करत विचारले कि, “तुमच्या बाबतीत नेमकं असं म्हंटल जात कि तुमच्या कडे अनेक गुण आहेत. आणि त्या गुणांवर आता उद्धव ठाकरेंचा सावली म्हणून मिलिंद नार्वेकरांकडे पाहिलं जायचं कि त्यांच्या अनेक आज उद्धव ठाकरेंनी जी वाटचाल केली आहे. त्यामध्ये कोणी नाकारू शकत कोणीही, पण जे लोक नीट सगळ्या गोष्टी बघतायतेत ते नाही नाकारणार कि उद्धव ठाकरेंची जे काही मिलिंद नार्वेकरांनी केलं ते वादात येतायेत. वरूण सरदेसाईना आदित्य ठाकरेंचा मिलिंद नार्वेकर व्हायचे कि मातोश्रीच्या मिलिंद नार्वेकर व्ह्याचे आहे?”असा प्रश्न विचारला.
या वर वरून सरदेसाई यांनी उत्तर दिल आहे. ते बोलले, “मला वाटतं मी अगदी लहान असल्यापासून मी मिलिंदजींना बघतोय आणि त्यांची एक काम करायची वेगळी पद्धत आहे. ते तसेही कधीही प्रेस समोर येत नाहीत. मी तर त्यांची एकाच मुलाखत पहिली आहे. ते पण तुमच्या सॊबतची होती. आणि मी तुम्हाला फोन पण केलेला. कोविडच्या वेळेला केलेली ती मुलखात होती. त्याच्या व्यतिरिक्त ते आमदार झाल्यावर सुद्धा मुलाखती दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी एक स्वतःची वेगळी निश पकडलेली आहे. मी माझ्या कामाची एक वेगळी निश पकडली आहे. माझं काम हे जर तुम्ही मगाशी ज्या लोकांचं उल्लेख केल. अकॅडेमिकस म्हणा किंवा संघटनात्मक म्हणा पार्टी लेव्हलला मी ते काम जास्त मी करत आलो. आणि मला त्याच्या मध्ये इंटरेस्ट पण आहे. जर माझ काही वेगळं असत तर मी आज विधानसभाची निवडणुकीसाठी उभा देखील राहिलो नसतो. त्यामुढे माझं एक कॅरिअर पाथ माझ्या डोक्यामध्ये मी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मिलिंदजींचा एक वेगळा पूर्ण एक रोल आहे. असं अजिबात माझं असं काही नाही आणि मातोश्रीचा सुद्धा असं काही मनात असेल असं काही नाही. मला असं वाटते युवक संघटनेतून प्रत्येक पक्ष युवक संघटनेला संधी देत असतो.आज भाजपने त्यांच्या युवक संघटनेला संधी दिली आहे, मनसेने दिलेली आहे, काँग्रेस ने दिलेली आहे, राष्ट्रवादीने दिलेली आहे, तशीच आमच्या युवा सेनेने सुद्धा माझ्या आधी सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता मला मिळालेली आहे. युवा सेनेत या पूर्वी सुद्धा अनेक लोकांना नगरसेवेकाची तिकीट मिळाली. त्यांना पक्षाचा नगरसेवक निवडून आणलं. अनेकांना वेगवेगळ्या समिती दिल्या. राज्यसरकार असताना त्यांना महामंडळसुद्धा मिळाली. तेव्हा लीडरशिप एस्टॅब्लिश व्हावी. या कारणातून त्यांचे चेहेरे पुढे यावे या कारणातून सगळे पक्ष काम करतात. त्या माध्यमातून आज मला पक्षानेही संधी दिलेली आहे.मला असं वाटत कि उद्या माझ्या मनामध्ये एक चित्र आहे कि आमदार झाल्यानंतर मला पक्ष वाढवायचं आहे. मला संघटना वाढवायची आहे. मला उद्धव ठाकरेसाहेबांना परत एकदा मुखयमंत्री म्हणून पाहायचंय. मी तर वारंवार भाषणात सुद्धा सांगतो कि माझ हे स्वप्न आहे कि मी मुखयमंत्री झाल्याच्यानंतर उद्धव ठकरे साहेबांच्या नेतृत्वखालच्या सरकार मध्ये मला सामील व्हायचंय. त्यामुढे माझा हा करिअर गोल सेट आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…