विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान झाले. एकूण २८८ जागांसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला उत्साहात मतदान झालं. काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी ऐनवेळेवर अपक्ष उमेदवाऱ्याला पाठिंबा देण्यात आला. ही विधानसभा निवडणूक महायुतीच्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट मुख्यतः यांच्यात आहे.
ऐन मतदानाच्या दिवशी प्रणितीशिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात आपला पाठिंबा महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला न देत अपक्ष उमेदवाराला जाहीर केला. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेना मध्ये चांगलीच जुंपल्याचा पाहायला मिळत आहे. या मतदारससंघातील हा वाद आणखी चिंगहाळतांना दिसून येत आहे. शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली. टीका केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शरद कोळी यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं सोलापूर दक्षिणच्या जागेवरुन दिसत आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. आई प्रणिती शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन केलं होत.
सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना पाठिंबा न देत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी याना पाठिंबा दिला. आता ऐन वेळेवर पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाला सुरवात झाल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी ने खुल्या शब्दात टीका केली आहे. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केला आहे. प्रणिती शिंदेंनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली. प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात आणि त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशाराही शरद कोळी यांनी दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानणे ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार? असा हल्लाबोल त्यांनी केला. आता, काँग्रेसकडूनही शरद कोळी यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आक्रमक
सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. शरद पवारांनी खुल्यासब्दात टीका केल्यानंतर युवक काँग्रेसच्या शाराध्यक्षानेही इशारा दिलाय आहे.प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो असे काँग्रेसच्या युवक नेत्याने म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले होते, काल केलेल्या आंदोलनानंतर आज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. तसेच, शरद कोळीची गाडी ज्या दिवशी ऑफिससमोर थांबेल, त्या दिवशी ती गाडी फोडणार, असा इशाराच काँग्रेसने दिला आहे.हा इशारा शरद कोळीचा ऑफिससमोर जाऊन देण्यात आला.