संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला पार पडले तर आज दि. २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला. महायुती आणि महाविकास आघाडी या चुरशीच्या लढतीत अखेर महायुतीने बाजी मारली. तर पराभूत झालेल्या पक्षांनी नाराजीचा सूर लगावला. अशातच आदित्य ठाकरे यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमने केलंय? आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा वरळीच्या मैदानातून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यांना महायुतीकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडेचं आव्हान होतं.
आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी वरळीकरांचे आणि मित्रपक्षांचे आभारही मानले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. तो आम्हाला ऑनग्राउंड जो निकाल वाटत होता तो दिसला नाही. महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम केलंय ? लोकसभेत याच महाराष्ट्रानं आम्हाला आशीर्वाद दिला, मात्र या निकालावर विचार चर्चा होईल. पण आता तो मान्य करूनच पुढे जावं लागेल.
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदासंघ चर्चेत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. वरळी विधानसभा मतदासंघातून तिरंगी लढत अत्यंत चुरशीची रंगली होती.
विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियानेच स्वतःला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही? अशा शब्दात संजय राऊत यांनी हातात आलेल्या निकालावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
Ajay Choudhary यांनी केला महायुतीवर हल्लाबोल | Shivdi Vidhansabha Election 2024 | Bala Nandgaonkar