spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

विधानसभेच्या पराभवानंतर Sharad Pawar यांनी दिले निवृत्तीच्या चर्चेवर सडेतोड उत्तर

महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीकडून आता सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु असल्याचे दिसत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत मौन सोडले असून मोठे भाष्य केले आहे.

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीकडून आता सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु असल्याचे दिसत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत मौन सोडले असून मोठे भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार यांनी त्यांच्या वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्ती घेणार? अशा चर्चा सर्वत्र सुरु झाल्या. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये.”

शरद पवार पुढे म्हणाले, “लाडक्या बहिणींना काही रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही सत्तेत आलो नाही तर ही योजना बंद होईल”, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले, असे वाटते. तर दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरून दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच ‘बटेंगे तो कंटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे विभाजीकरण झाले. त्याचा फायदा महायुतीला झाला.

उद्धव ठाकरे यांनी पराभवाचे कारण ईव्हीएमवर फोडले. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर काही बोलणार नाही. महाराष्ट्र निवडणुकीसाठी ईव्हीएम मध्य  प्रदेशातून आल्याची चर्चा असल्याचे शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर शरद पवार म्हणाले, ईव्हीएम मध्य प्रदेशातून आले की गुजरातमधून यासंदर्भात जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही.

हे ही वाचा:

सर्वसामान्य जनतेचा रोष होता म्हणून यशोमती ठाकूर यांचा पराभव: Rajesh Wankhede

Manoj Jarange यांचा फडणवीसांना इशारा, म्हणाले, “तू पुन्हा आला की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss