spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील तपासली बॅग, पालघर हेलिपॅडवर झाली तपासणी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेचीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झडती घेण्यात आली. पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगची तपासणी केली.

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅगची तपासणी ही करण्यात आली यावेळी त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला अंडी सरकारवर जोडणे हल्लबोल देखील केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेचीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झडती घेण्यात आली. पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगची तपासणी केली. पालघर येथील कोलवडे पोलीस परेड ग्राउंड येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांची बॅग तपासण्यात आली. हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्याच्या बॅगची झडती घेण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांची बॅगही तपासण्यात आली आहे. केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे पुरेसे नाही आणि प्रत्येकाने घटनात्मक व्यवस्थेचेही पालन केले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपने पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही नेत्यांना ‘नाटक’ करण्याची सवय आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष असलेल्या शिवसेनेने (UBT) गेल्या दोन दिवसांत व्हिडीओ शेअर केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सामानाची झडती घेण्यात आली होती ठाकरे यांनी बॅग तपासताना पाहिले.

गेल्या दोन दिवसांत ठाकरे यांनी दावा केला की, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पोहोचल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची ‘बॅग’ तपासली. हाच नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनाही त्यांच्या निवडणूक प्रचारात लागू होणार का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला होता. भाजपच्या राज्य युनिटने बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘X’ वर एक फुटेज पोस्ट केले, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर फडणवीस यांची बॅग तपासताना दिसू शकतात.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss