राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. राज्यात महायुतीने बाजी मारली आहे. तर महाविकासा आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीने २३० जागेंवर विजय मिळवला. त्यात भाजपने १३२ जागेवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने ५७ जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४१ जागांवर विजय मिळवला. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”