spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Akhil Chitre यांचा मनसेला रामराम; Shivsena ठाकरे गटात केला प्रवेश

आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का दिला. वरळीतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत वाढतोय. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का दिला. वरळीतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे.

मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांचा आज दि. ७ नोव्हेंबर मातोष्ट्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते. तृप्ती सावंत याना बाहेरून शेवटच्या क्षणी मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखिल चित्रे यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व इथून मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास ११ हजार मते मिळाली होती. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर अखिल चित्रे यांनी जय महाराष्ट्र करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच मनसेला हा मोठा धक्का आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतरच मनसेचे नाराज नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अखिल चित्रे हे मनसेला जय महाराष्ट्र करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. आता अखिल चित्रे यांनी त्या चर्चांना प्रात्यक्षिक रूप दिले.

हे ही वाचा:

चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला टोला, घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही…

महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा… Sadabhau Khot यांचा Sharad Pawar यांच्यावर खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss