राज्यात विधानसभा निवडणुकीचा मतदान २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला या निवडणुकिचा निकाल लागणार आहे. निवडणुकीचा माहोल तापलेला आहे आणि नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करता आहेत. याच पार्श्वभूमीवर टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी भाजपचे आमदार आणि वांद्रे पश्चिमचे उमेदवार आशिष शेलार यांची मुलाखत घेतली आहे. टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी आशिष शेलार यांना “गेल्या पाच वर्षामध्ये आशिष शेलारांकडून झालेली राजकीय चूक कोणती?” असा प्रश्न विचारण्यात आल्यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय.
खूप आहे एक काय सांगू. मी देव नाही आणि कोणीच देव नाही आहे आणि मी माणूस आहे. भावना प्रधान माणूस आहे. आणि त्यामुळे चुका झाल्याने पण त्याचा विचार मी करतो एवढं नक्की सांगतो. मी मागे पुढे पाहतो आणि म्हणून कदाचित माझ्या तोंडून आता जे वाक्य तुमच्या समोर आलं किंवा मी बोललो या पुढे तिथेही विचार करायचा म्हणजे करू नये पक्षाने. यात निराशा नाही, राग नाही, रुसवा नाही, फुगवा नाही. आठ बाय सातच्या खोलीत राहणाऱ्या आशिष शेलारला जर तुम्ही म्हणाला तर याच्याशी संपर्क कर, त्याच्याशी संपर्क कर या इथपर्यंत सद्गुरू कृपेने आला आहे. पक्षाने आणलं, संघाने आणलं, विचारधारेने आणलं, मंत्री झालो. मी जेव्हा मरेल तेव्हा माझी मंत्री म्हणून तिरंगा सलामी मिळणारच आहे. आमच्या शेलार कुटुंबातला आणि आमच्या पूर्ण गावातल्या किंवा आमच्या पंचक्रोशीत कुणाला मिळणार आहे का? मी अहंकारापोटी बोलत नाही आणि आपल्या कोकणी भाषेतला एक हा मुद्दा मांडतो. आता विचारधारेला आणि देशाला द्याच आहे एवढीच कमिटमेंट की या चुका मी सुधारणार. पूर्णपणे सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…