spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Avinash Jadhav Exclusive Interview: लोकांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले, आम्ही काम करतो म्हणून ते…

Avinash Jadhav Exclusive Interview: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टाईम महाराष्ट्राला (Time Maharashtra) दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.

राज ठाकरे एका बाजूला राजकीय वनवास करताहेत. एका बाजूला अलिप्त पडले आहेत. असताना मनसेचा मतदार इंटॅक्ट राहिला. त्या मतदाराकडे गेली अठरा वर्षे तुम्ही मते कशाच्या आधारावर मागितली असा प्रश्न अविनाश जाधव यांना विचारला असता ते म्हणाले, “हा मतदार आम्ही काम करतो म्हणून आमच्यासोबत आहे. निवडून आलेले सत्ताधारी त्यांना कधीच भेटत नाहीत. त्यांना अविनाश जाधव भेटतो. त्यांना राजू पाटील भेटतो. त्यांना संदीप देशपांडे भेटतो. त्यांना शिरीष सावंत भेटतो. त्यांना सत्ताधाऱ्यांकडे कधी जावंसं वाटत नाही. माझं कार्यालय नेहमी लोकांनी भरलेलं असतं ज्या लोकांची कामे केली ते लोक मतदान करतील.”

“आम्ही कोणाच्या उपकारावर जगत नाही. बापजाद्यांच्या पुण्याईवरही आम्ही जगत नाही. मागच्यावेळेस माझयाविरुद्ध नेरेटिव्ह पसरवला होता कि मला २० हजारदेखील मते मिळणार नाहीत. मी ७५ हजार मते घेतली. यावेळेस मी १ लाख क्रॉस करणार. हे मी सांगतोय ते ठाण्यात केलेलं काम बोलेल. संपूर्ण महाराष्ट्रात एक उदाहरण मी ठेवील कि काम केलेल्या मुलाला लोक मतदान करतात. मग तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभे आहात त्याची फिकीर नाही. तुम्ही काम करा. लोक तुमच्यासोबत राहणार. मी खात्रीने सांगतो मी एक लाख क्रॉस करणार. बाकीचे लोक काय बोलतात, काय नेरेटिव्ह पसरवतात. हे सोडून द्या. मला या लोकांची सवय झाली आहे. एक नेरेटिव्ह बनवून लोकांमध्ये सोडणं आणि चर्चा घडवून आणणं. आणि त्यातून आपला मतदार घडवून आणणं. दोन प्रकारचे मतदार असतात. एक ठाम राहणारा आणि एक सतत फ्लोट होणारा. तो मतदार खेचण्याचा त्यांचा प्रयात्न असतो. तर मी जिथे जातो तिथे खात्रीने सांगतो कि निवडून येणार आहे. कारण मी केलेलं काम ठाण्यात लोकांनां माहितीये. ठाण्यातल्या कोणत्याही लोकांना तुम्ही विचारा.”

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss