spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Bala Nandgaonkar Exclusive Interview : व्हीलचेअर वरूनही सुरूय बाळा नांदगावकरांचा प्रचार, निष्क्रीयतेने शिवडीकर बेजार!

Bala Nandgaonkar Exclusive Interview : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अश्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील ऍक्टिव मोडमध्ये आली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील व्हीलचेअर बसून त्यांचा प्रचार करत आहेत. याच संदर्भात

 

विधानसभा निवडणूक २०२४ आता ७ दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सगळे पक्ष प्रचार सभा करत आहे. यातच प्रचार करत असताना महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना दुखापत झाली. कशी दुखापत झाली? काय झालं? आणि केव्हा झाली? यासंदर्भात टाईम महाराष्ट्राचे संस्थापक राजेश कोचरेकर यांनी बाळा नांदगावकर यांची मुलाखत घेतली. या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांच्यासोबत गेली ११ वर्ष महाराष्ट्र नवं निर्माण सेनेमध्ये असलेले अगदी निकट वर्तिय सहकारी आणि त्याही आधी शिवसेना मुशीत तयार झालेले कडवट शिवसैनिक, ज्यांना महाराष्ट्र जाईंट किलर म्हणून ओळखलं जाते, ते बाळा नांदगावकर. सध्या बाळा नांदगावकर हे व्हीलचेअरवर दिसत आहेत परंतु या व्हीलचेअरवर असण्याचं नेमकं कारण काय आहे. ते जसे व्हील चेअर वर आले आहे त्यानंतर मनसेचा इथला प्रचार हा दिवसागणिक कठीण होत चालाय. काय नेमकी परिस्तिथी आहे असा प्रश्न यावेळी बाळा नांदगावकर याना विचारण्यात आला. तसेच बाळा नांदगावकर जी गेली अनेक वर्ष तुम्ही संघर्ष करत आहे. महाराष्ट्रात जाईंट किलर म्हणून तुमची झालेली इमेज ९० च्या दशकात छगन भुजबळांचा केलेला पराभव आणि आता शिवडी या मतदारसंघातुन तुम्ही न आजमावत असलेलं नशीब कारण या मतदारसंघमध्ये आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराला हॅट्ट्रिक करता आलेली नाही आहे. हा मतदार संघाचा इतिहास सांगतोय. आणि या अश्या सगळ्या परिस्तिथी मध्ये आज तुम्ही पुन्हा एकदा मनसेच इंजिन घेऊन या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उतरलेले आहेत. काय नेमकी परिस्तिथी आहे? पायाला झालेली दुखापत, राज ठाकरें यांचा गेल्या अनेक वर्षाचा सुरु असलेला राजकीय संघर्ष याच्या मध्ये तुम्ही बाळा नांदगावकर या यशश्वी वाटणाऱ्या राजकारण्यांची दमछाक झाली आहे. असा प्रश्न बाळा नांदगावकरांना विचारण्यात आला आहे.

यावेळी बोलत असताना बाळा नांदगावकर म्हणाले आहेत की, बाळासाहेबांचं काळ पाहिल्यात ना तो पण संघर्षातून गेलेला आहे. १९७६ साली स्थापन करण्यात आलेली शिवसेना त्याला यशाला १९८५ पहिलं वर्ष लागलं त्याच्यामुळे संघर्ष आमच्या आयुष्यातलं भाग आहे आणि जे संघर्ष करत पुढे येतात ना ते एक्दम कडवट आणि घट्ट तयार होतात. आणि संघर्ष आहेत आमला सोडून जे काही यश मिळालं होत त्यांनी आता थोडासा यश केलं आहे ठीक आहे. ते काही हरकत नाही मला याच्या बद्दल आणि गोष्ट खरी आहे. कि मला आता थोडीशी जखम झालेली आहे. मी आता डॉक्टर कडे जाऊन आलो. ३० तारीख पर्यंत प्लास्टर काढता येणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी जवळ जवळ ७०% हुन जास्त प्रचार हा दोरडुन हो पूर्ण केलेलं आहे. स्वतः जाऊन त्या ४० वयाचे माळ्याचे त्या २४,२३,१८,१६,७,५ जवळ जवळ माळ्यावर चढलो आहे आणि २३ माळे खाली उतरलो.

२ तारखेला असाच विभागामध्ये पूर्ण दिवसाचा प्रचार करतो ३०-३५ mrp जवळ जवळ माझ्या पूर्ण झाल्या. रात्री ८ वाजता मात्र इमारत क्रमांक १७ या ठिकाणी प्रचार करायला ४ माळे चढलो. ४ माळ्यावरती पर्यंत भेटलो गच्चीवरून खाली उतरत असताना एक पायरी कास आली ती मला कळाली नाही आणि त्याच्या मध्ये माझा पाय मुरगळला. आता पाय मुरगळला ठीक आहे मला थोडीशी कळ लागली पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि त्याच्या नंतर मी पूर्ण इमारतीला चढलो म्हणजे ८ बिल्डिंग एकटुआली त्या चड उतार परत केलं. आणि त्याच्या मुढे पाय खूपच ठणकायला लागला म्हणून प्रचार थांबवला. नंतर मी इमारत चढलो नाही. नंतर माझा पाय खूप दुखत होता. माझा पाय मुरगळला. म्हणून डॉक्टरला सांगितलं नंतर त्यांनी एक्सरचे काढायला लावला आणि ते म्हणाले तुमच्या पायाला फ्रॅक्चर आहे . त्याच्या पुढे तुम्हाला आता ताबडतोब हॉस्पिटलला यावं लागेल. मग त्याने तिथे ताबडतोब प्लास्टर घातला. मला म्हणाले ऍडमिट वगैरे हो . मी म्हंटल ऍडमिट वगैरे मी होऊ शकत नाही. माझा प्रचार चालू आहे. मग ते म्हणाले तुम्ही घरी जा आणि अराम करा. मग प्लास्टर घालून त्या प्रमाणे घरी गेलो परंतु ३ – ४ दिवस नंतर कास आहे कि मी त्यांना होत गेला. २ तारखेला अपघात झाला ३ तारखेला राज ठाकरे माझ्या घरी आले साहेब आले होते घरी ४ – ५ दोन दिवस मी अराम केला पण माझी मुलगी आणि बायको म्हणाली कि, तुम्ही घरी आहात तर आम्ही प्रचार करतो. माझी मुलगी श्रुष्टि बाळा नांदगावकर आता प्रचाराला फिरतंय. घरोघरी ती जात आहे आणि बायको पण मध्ये मध्ये माझ्या सोबत येते. पण शेवटी ६ तारखेला डॉक्टरांना फोन केला. आणि म्हणालो डॉक्टर साहेब काय करू सांगा. ते बोलले तुम्ही आता ६ आठवडे रेस्ट शिवाय कुठेच जाता येणार नाही म्हंटल. मी घरी नाही बसू शकत लोकांना जरी भेटलो नाही तर लोकही माझी शक्ती आहे टॉनिक आहे एनर्जी आहे पवार आहे. त्यांच्या पासून दूर आम्ही राहू शकत नाही. काय आणि आम्ही बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे. राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिक आहे. आम्हाला बाळासाहेबांनी लढवलेल आहे. लढवैये म्हणून आम्ही लोक आहोत. आम्ही असं थोडी बारिकश्या गोष्टीने आम्ही घरी बसणारे नाहीत. व्हील चेअर घे म्हंटल घेतलं. व्हील चेअर वरती जाईल मी प्रचाराला पाय जमिनीवर टेकवू नका म्हंटल्यावर नाय टेकवत. तुमच्या सूचना मी पूर्ण पाळली पण मी जाणार. मग त्यांची परमिशन घेतली राज ठाकरेला फोन केला. ते नागपूरला होते. त्यांची परमिशन घेतली ते तयार नव्हते. म्हंटल नाही मी जाणार आणि आज प्रचाराला आलो. आता तुम्ही म्हणाल माझा प्रचार कठीण नाही होत चालाय. आणखीन दिवसानं दिवस वाढत चालाय त्याच्यावर हे बघा कमळ माझ्या सोबत आहे. हे धनुष्यबाण माझ्या सोबत आहे, आणि रेल्वे इंजिन पण माझ्या सोबत आहे. ऍध्ये खाली झेंडे नाही झोडपत हे झेंडे पकडणारे लोक पण माझ्या सोबत आहे. आणि दिवसानदिवस प्रचार वाढत चालेल आहे. एका बाजूला प्रचाराचं प्रचंड या ठिकाणी जोश वाढत चालेल आहे. लोकांना वाटते कि आता काय आम्ही बालानंदगावकर आमच्याकडे नेहमी येणार माणूस अचानक आला नाही त्याच्या मुढे वाईट वाटत असेल असा मला वाटते. पण मी तरीपण येतोय भेटतोय आणि माझा प्रचार हा चालू आहे.

Latest Posts

Don't Miss