विधानसभा निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबरला झालं आहे आणि या मतदानाच्या निकालाला आता २४ तासापेक्षा कमी कालावधी उरलेली आहे. कोणाची सत्ता येईल, कोण मुख्यमंत्री होईल. या निकालाचा चित्र काय आहे? यावेळी महायुती आणि महविकास आघाडी आणि मनसेमध्ये जोरदार धडक झाली. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे. सर्वाधिक मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मागच्या ३० वर्षातील सर्वाधिक मतदान झालं आहे. ६६ टक्के यावेळेस मतदान झाले आहे. हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. त्याशिवाय अन्य कल्याणकारी योजना सुरु केल्या. लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. अन्य योजना मोफत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. मतदानाची वाढती टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे आता उद्या 23 नोव्हेंबरलाच माहिती पडेल.
मतदानाच्या नंतर एक्झिट पोल सुरु झालं आणि एक्झिट पोलचे आकडे समोर आले. बहुतांश बहुतांश एक्झिट पोल्सनी पुन्हा महायुती सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत लागेल असा अंदाज आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन महायुतीने आता पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. निकालाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Action मध्ये आले आहेत.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत दिसणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यांवर सोपवल्याची माहीती आहे.
भाजप नेते सक्रीय
दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहीती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान