spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Bhaskar Jadhav: शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भास्कर जाधव यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “तुम्ही आणि संबंध महाराष्ट्र माझं अभिनंदन करत आहे असं समजून आभार मानतो. माझी गटनेते पदी निवड झाली हे अनपेक्षित आहे, स्वत: लाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं. मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. मी मुंबईत राहणारा माणूस नाही, मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मंत्रालयात जाणं- येणं सोयीच ठरतं. त्यामुळे ही निवड मुंबईमध्ये राहणाऱ्या एका जेष्ठ नेत्याची व्हावी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता. पण अध्यक्षांनी माझी निवड केली, तसा आदेश दिला त्यामुळे तो मी स्वीकारला. शपथ विधी झाला कि आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की सरकारकडे विरोधीपक्षनेते पद मिळावं याची मागणी करु,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना नेते या आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोप पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उबाठा गटातील निर्णय होतील.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss