सध्या सगळीकडे निवडणुकांचे वारे हे वाहत आहेत. महाराष्ट्र राज्य सोबत झारखंडमध्ये देखील निवडणुका या होणार आहेत. आणि येथूनच मोठी अपडेट समोर आली आहे. झारखंडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घराघरा छापा टाकण्यात आला आहे.
आयकर विभागाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वैयक्तिक सल्लागार सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने सुनील श्रीवास्तव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांशी संबंधित एकूण १६-१७ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेसमोर आलेल्या माहितीनुसार, रांचीमध्ये सात आणि जमशेदपूरमध्ये ९ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही समावेश आहे. याबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे. याआधी २६ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीदरम्यान हवालाद्वारे पैशांच्या व्यवहाराच्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकाता येथे छापे टाकले होते. या काळात आयकर विभागाने हवाला व्यापाऱ्यांच्या ठिकाणांहून १५० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती.
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी हेमंत सरकारचे मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. या काळात ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले होते. जलजीवन अभियानाशी संबंधित योजनांमधील अनियमिततेबाबत हा छापा टाकण्यात आला. ईडीच्या पथकाने मिथलेश ठाकूरचा भाऊ विनय ठाकूर, खासगी सचिव हरेंद्र सिंह आणि अनेक विभागीय अभियंत्यांच्या घरांवर छापे टाकले होते. मंत्री मिथिलेश ठाकूर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीच्या छाप्याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले होते की, हे अनपेक्षित नाही. आमच्या विरोधी मित्रांना निवडणुकीच्या काळात हे सर्व पुन्हा दिसू लागले आहे. त्यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर