spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मोठी बातमी:अबू आझमीला आला हृदयविकाराचा झटका; प्रकुर्ती नाजूक

समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमीला हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकुर्ती नाजूक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आलं आहे. रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

विधानसभा निवडणूक २०२४ आता काही तासांवर आलं आहे. आणि प्रचार सभा आज पासून थंडावणार आहे. कोण होणार मुखयमंत्री, कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आणि त्यातच मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमीला हृदयविकाराचा झटका आलाय आहे. आणि त्यांची प्रकुर्ती नाजूक आहे. त्यांना रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अबू आझमी हे मानखुर्द शिवाजी नगर या मतदारसंघातून उभे आहेत. आणि त्यांच्या विरोधात नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)  उभे आहते.

अबू आझमी यांनी १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. 2004 मध्ये, त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या चक्रात प्रवेश करताना, आझमी यांचा भिवंडी मतदारसंघातून शिवसेनेच्या योगेश पाटील यांच्याकडून पराभव झाला. 2002 ते 2008 पर्यंत, आझमी राज्यसभेचे खासदार (MP) होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आझमी यांचा गुरुदास कामत (काँग्रेस) यांच्याकडून पराभव झाला . तथापि, 2009 मध्ये, आझमी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले जेथे त्यांनी दोन वेळा काम केले. त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) च्या जागा यशस्वीपणे लढवल्या आणि यशस्वी उमेदवारांना एका प्रदेशापुरते मर्यादित ठेवण्याच्या नियमांनुसार त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगर निवडले.आझमी हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी एकाच निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत.आझमी यांनी 2009 ते 2024 या काळात त्यांच्या मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात सलग तीन विजय मिळवले आहेत .

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss