विधानसभा निवसणुकीसाठी आता फक्त १ दिवस बाकी राहिला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. 2019 नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले. त्यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपाला पाठिंबा दिला. आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं भाजपला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले.
या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता सर्वांमध्ये आहे.
सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्याची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं. मात्र अनेक नेत्यांनी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची टाकत वाढली आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.