spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये; आमदारांसाठी विशेष व्यवस्था

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले.

Maharashtra Assembly Election 2024: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या मतदानाचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. आणि आता अवघ्या काही तासांत निकाल हा समोर येणार आहे. काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. येथील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे मतदान होताच मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान वाढल्याने काँग्रेसचा विजयाबाबतचा विश्वास दुणावला आहे. सोबतच निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यात सरासरी ४ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतटक्का वाढतो, असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेचीही जबाबदारी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेचच ‘एक्झिट पोल्स’चे अंदाज यायला सुरुवात झाली. जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसते आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी ‘एक्झिट पोल्स’नी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यावरून काँग्रेस तयारीला लागले आहे.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss