राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे,” असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे.
“महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन टक्क्यांनी घसरला आहे तर गुजरातचा वाटा हा ७ टक्क्यांनी वाढला आहे असे गाडगीळ यांनी दर्शनास आणून दिले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन कोटी रोजगार देण्याच्या व वल्गणा करणाऱ्या मोदी सरकारच्या गेल्या ७ वर्षात तब्बल ५० लाख नोकऱ्या गेल्या आहेत ही आकडेवारी का झाकून ठेवल्या जात आहे,” असा सवालही गाडगीळ यांनी केला आहे.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
- महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात मिळणार
- महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणणार
- ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज,
- नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर
- सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरणार
- एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती करणार
- सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार
- सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार
- महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर भर
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करणार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवणार
- शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करून २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प
हे ही वाचा:
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…