spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Devendra Fadanvis Live From Shivaji Park: मोदींच्या नेतृत्वात महायुतीने मोदींचा चेहरा बदलला

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (गुरुवार, १४ नोव्हेंबर) महायुतीची सभा आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडत आहे. यावेळी उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी मोदींच्या नेतृत्वात केलीली कामे सांगितली.

 

ते बोलले, मुंबई मध्ये मी मोदीजींचे आभार मानतो. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात महायुती १ आणि महायुती २ या दोन्ही सरकारांनी मुंबईचा चेहरा बदलवून दाखवला कारण मोदीजींचा आशीर्वाद होता. पहिलं मुंबईकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न मुंबईकरांच ६० टक्के जीवन हे केवळ प्रवासा मध्ये जात. त्यांचा सगळ्यात क्वालिटी वेळ हा प्रवासामध्ये जातो. मुंबई करांचा प्रवास सुकर झाला पाहिजे म्हणून मोदींच्या नेतृत्वात मुंबईच्या सबर्बन रेल्वेचा चेहरा बदलला. त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतील, एसकेलेटर असतील, लिफ्ट असेल, पॅसेंजर सुविधा असेल, नवीन डब्बे असतील, नवीन ट्रेन असतील, त्याची FREQUENCY असेल पूर्ण पणे ही सबर्बन रेल्वे बदलली आणि १ वर्षात ११ किलोमीटर मेट्रो केली. आपल्या सरकारने पाच वर्षांमध्ये साडेतीनशे किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरु केलं. मोदीजींच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोस्टल रोड तयार केला. नरिमन पॉंईंट पासन वरळी पर्यंत. वरळी वांद्रे रोड आहे. वांद्रे वर्सोव्याच काम चालू आहे. वर्सोवा म्हण याचा काम चालू आहे. उत्तर पासन विरार पर्यंत हे संपूर्ण वेस्ट कोस्ट आहे. या ठिकाणी पूर्णपणे सिमलेसली ४० मिनिटामध्ये नरिमन पॉईंट ती विरार जात येईल. अश्या प्रकारची व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेस वाला डीकंजस्टेबल करण्याचं काम हे आपल्या सरकार नि केलं. आणि तिकडंन विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला तयामुळे MMR रिजन मध्ये पूर्णपणे एक लूप तयार झाला. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं २२ किलोमीटरच अटल सेतू ने मुंबई आणि नवी मुंबई आणि MMR रिजन मध्ये लोकन करता प्रवास सुखात व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली. असे ते सभेत बोलत होते

पुढे ते बोलले, दुसरं महत्वाचं मुंबईकरांचं प्रश्न घराचा. वर्षांनुवर्षं माझा मुंबईचा मराठी माणूस या घरांकरिता तडपट होता. मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्याठिकाणी BDD चाळीची रिडेव्हलोपमेंट असो अभ्युदय नगरसारखी योजना असो, विशाल सयाद्री सारखी योजना असो. अनेक अश्या प्रकारच्या वस्त्या ज्याचं रिडेव्हलोपमेंट बाकी होत. केवळ कागदावर होत. ते रिडेव्हलोपमेंट नीट करून दाखवलं अश्या १०० योजना मी सांगू शकतो. धारावीच रिडेव्हलोपमेंट जे केवळ कागदावर होत. ते आपल्या सरकारने करून दाखवलं, आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो हे जे काही या ठिकाणी बोलतायत पुढच्या ५ – ६ वर्षांमध्ये माझा धारावीचा माणूस धारावी मध्येच पक्क्या, चांगल्या, सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल.

मोदीजींच्या आशीर्वादाने आपण पाहू शकतो, आज मुंबई मध्ये रिडेव्हलोपमेंट सुरु झाली. त्यातल्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या. १८ निर्णय घेतले आणि मुंबई करांना सेल्फ फ्री डेव्हलोपमेंटच्या माध्यमांतून १६शे आता पाईप लाईन मध्ये पुढच्या काळामध्ये १०० SQ फूट च्या घरामध्ये राहणाऱ्या हे ५०० SQ फूट मध्ये रिडेव्हलोपमेंटच्या माध्यमातून याच मुंबई मध्ये मिळतंय आणि SRA मध्ये ५० वर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यानां लोक बाहेरून येतात घर मिळत नव्हती. आमच्या मुख्यमंत्रांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था MMRD असेल सिडको असेल सगळ्या संस्था झोपडपट्टी धारावी करितां घर बांदतायेत.

हे ही वाचा:

Raju Patil Exclusive Interview : …ते खासदार असतील त्यांच्या घरी; राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

Najeeb Mulla Exclusive Interview: सुरज परमार प्रकरणात मला Eknath Shinde यांनी सांभाळलं, आव्हाड बिळात लपून बसले होते…

Latest Posts

Don't Miss