Devendra Fadnavis Malad Live : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ११ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे. अश्यातच सर्व नेतेमंडळींनी प्रचाराचा त्याच सोबत सभांचा धडाका हा लावला आहे. याचस पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोद शेलार यांच्या प्रचारार्थ मालाड येथे जाहीर सभा चालू आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
यावेळी सभेला बोलताना सुरुवात करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी अनेक अनेक घोषणा दिल्या आहेत. राजनीतीला मिशन मानून राजकारणात आलेले विनोद शेलार यांच्यासाठी मी आज आलो आहे. या मुंबईचे बदलते स्वरूप आज आम्ही जे बघतो ते २०१४ मध्ये मोदींचे सरकार आले आणि त्यांच्या आशिर्वाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आणि मुंबईचा चेहरा बदलायला आम्ही सुरवात केली. त्याच्या आधी १९९५ – १९९९ ताक महायुतीचे सरकार होत आम्ही तेव्हा मुंबईला बदलली परंतु या १५ वर्षात काँग्रेस चं सरकार हे मुंबई आणि महाराष्ट्राने बघितलं आणि २५ वर्ष आमच्या मित्रांचं सरकार पण महाराष्ट्राने बघितलं. परंतु यांच्यातून कोणी पण उबाठा किंवा काँग्रेस च्या नेते मुंबईसाठी केलेले एक काम दाखवू शकत नाही. २०१४ च्या नंतर मुंबई ज्या पद्धतीने बदली आहे त्याच सर्व श्रेय हे मोदी ना जात.
तसे तर मुंबईकरांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत परंतु मुंबईकरांचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत पहिला म्हणजे मुंबईकरांना येण्याचा वेळ जो कालावधी आलावा लागतो तो मला असं वाटतं की मुंबई घरातील असे अनेक आहेत ते यांचे आपल्या घरापेक्षा कमी आणि येण्या जाण्यामध्येच जास्त वेळ घालवतात. हे सध्या मुंबईची अवस्था आहे मुंबईची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला. काँग्रेस सरकारने अकरा वर्षात मुंबईमध्ये 11 किलोमीटरचं मेट्रोचे नेटवर्क सुरू केला तर आपल्या सरकारने 354 किलोमीटरचा नेटवर्कची सुरुवात केली आहे. आतापर्यंत शंभर किलोमीटरचे नेटवर्क पूर्ण झाले आहे आणि यापुढे पन्नास पन्नास किलोमीटर असेल नेटवर्क हे पूर्ण होईल.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…