spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदही घेणार नाहीत…

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे हे आपल्याला दिसला आहे. महायुतीने २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवला. महायुतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती. निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतली, तो मान्य असेल, सरकार स्थापनेत ते अडसर बनणार नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची मागणी करणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे.

एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाहीत – संजय शिरसाट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, याबाबतची माहिती शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यास सांगेल, असेही शिरसाट म्हणाले. शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Latest Posts

Don't Miss