राज्यात विधानसभा निवडणुक मतदानासाठी आता काही तास बाकी आहेत. सोमवारी निवडणुकीचा प्रचार थंडावल्या आहेत. प्रचार थंडावल्यानंतरही टीव्ही वरील मालिकांमध्ये छुप्या पद्धतीने प्रचार होत असल्याचे समोर येत आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांमधून चित्रीकरण करतांना शिंदे गटाच्या प्रचाराची पोस्टर दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. पैश्यांची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे.
सोमवारी निवडणुकीच्या प्रचार थंडावल्या असून टीव्ही मालिकांमध्ये छुप्या प्रचार होत असल्याचं समोर येत आहे. स्टार प्रवाहची मालिका घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिकांचं चित्रीकरण करतांना शिंदे गटाच्या प्रचाराची पोस्टर दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. मालिकांमध्ये छुपा प्रचार करतांना पैश्यांची देवाणघेवाण झाल्याचं संशय आहे. छुपा प्रचार केल्यानं आता निवडणूक आयोगानं शिंदे गटाला येत्या २४ तासात आपली भूमिका स्पष्ट करण्याचं सांगण्यात आलं आहे. काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी हा मालिकांमधून छूपा प्रचार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
स्टारप्रवाहच्या कोणत्या मालिका ?
स्टार प्रवाह चॅनलवर लागणाऱ्या दोन मालिकांमधून शिवसेना शिंदे गटाचा छूपा प्रचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्टारप्रवाहच्या प्रेमाची गोष्ट आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांमधून चित्रकरण करताना शिंदे गटाची पोस्टर्स दाखवण्यात आली होती. पण या मालिकांच्या ओटीटीवरील प्रक्षेपणात ही पोस्टर नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं शिंदे गटानं छुपा प्रचार केल्याचं सांगण्यात येत आहे. यात किती पैशांची देवाणघेवाण झाली असा सवालही उपस्थित होत आहे.
निवडणूक आयोगानं घेतली दखल
प्रचार सोमवारी १८ तारखेला थंडावली असून सुद्धा सोशल मीडियावरून तसेच मालिकांमधून छुपा प्रचार करण्याचा घाट शिंदे गटाने घातला असल्याची तक्रार काँग्रेसनेते संचित सावंत यांनी शिंदे गटाकडून छुपा प्रचार होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.निवडणूक आयोगानं मालिकांमधून होणाऱ्या छुप्या प्रचाराची दखल घेतली असून शिवसेना शिंदे गटाला पुढील दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तशी लेखी नोटीसही शिंदे गटाला बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…