spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis: वीस मुखयमंत्र्यांपैकी मी एकटाच असा ज्याचा मुंबईत घर नाही…

मी एकटा मुखयमंत्री आहे ज्याचा मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझा घर नागपूर मध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा गर्व आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांनी भावनिक साद घातली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार सभा होती. त्या प्रचार सभेत ते बोलत होते.

नेमके फडणवीस काय बोलले…

मी कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत. महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचा मुंबईत स्वतःचे घर नाही आहे. आजही माझे घर नागपूर मध्येच आहे.

सलग पाच वेळा तुम्ही आमदार म्हणून मला निवडून दिले. कधी विरोधी पक्षात काम केलं, तर कधी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून ही काम केले, मात्र या सर्व कारकिर्दीत मी महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांची दक्षिण पश्चिम नागपूरच्या मतदारांची मान उंच ठेवली. कधीही तुम्हाला खाली पाहायला लावलं नाही. जो आमदार तुम्ही निवडून दिला त्या आमदाराने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन वर आणून दाखवले, हे मी गर्वाने बोलू शकतो.

पुढे ते बोलले पंचवीस वर्ष विधानसभेत काम करतो आहे, त्याच्यापूर्वी नगरसेवक आणि महापौर ही राहिलो. मात्र माझ्या या राजकीय वाटचालीत नेहमी समाजासाठी काम करण्याचा तत्व ठेवलं. मी स्वतःचा विचार कधीच केला नाही. देवेंद्र फडणवीस ने कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचा उद्योग किंवा शिक्षण संस्था उभी केली नाही. मेडिकल कॉलेज उभारले नाही. स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही. फक्त तुमच्यासाठी काम केलं. म्हणून महाराष्ट्रात आजवर वीस मुख्यमंत्री झाले, पण या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचा मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझा घर नागपूर मध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा गर्व आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील मालवणी परिसरात सभा होणार आहे. ही सभा ९ वाजता सुरु होणार असून राजे शहाजी मैदानावर आहे. या मतदारसंघात भाजपचें विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री 8 वाजता फडणवीसांची सभा होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

IANS Matrize Survey: मोठी बातमी! महानिवडणुकीचा सर्वे आला समोर… महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss