spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मी पैसा-प्रॉपर्टी नाही कमावली पण प्रेम मिळवले, Buldhana च्या प्रचारसभेत काय म्हणाले CM Shinde?

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलढाणा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांची विकेट घेऊन चौकार घ्यायचा आहे, भरवशाचा प्लेयर आहे. आक्रमक आणि जनहितासाठी धडपड करणारा रायमूलकर आहे. राजा का बेटा राजा नही होगा, जो काम करेगा वही राजा होगा, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. प्रेम-विश्वास मला मिळतो आहे, मी पैसा प्रॉपर्टी नाही कमावली पण प्रेम मिळवले आहे. ४५०० कोटी रुपयाचा निधी आणला आहे. आपण घेतलेला निर्णय बरोबर होता ना, उठाव केलेला बरोबर होता ना, टांगा पलटी केला बरोबर ना? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो. हे चोरलं ते चोरलं करतात, ते खेळणं आहे का ? तुम्ही झोपला होतात का? असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर टीकास्त्र उगारले.

५० आमदार, १३ खासदार आले, लाखो कार्यकर्ते आले. लोकसभेत धनुष्यबाण कोणाचे, शिवसेना कोणाची हे सिद्ध झालं आहे. जेव्हा पापाचा घडा भरला तेव्हा निर्णय घेतला. ही देना बँक आहे लेना बँक नाही. १५०० हजारवर थांबणार नाही, मला महिलांना लखपती करायचे आहे. शेतकर्‍यांना पूर्ण कर्ज माफी करणार. शेवटी शेतकऱ्यांना आपल्यालाच द्यायचे आहे. विरोधकांकडे काही शिल्लक नाही त्यांनी आपला जाहीरनामा चोरला आहे. योजनेमध्ये सगळे आहेत. आपण दुजाभाव केला नाही. ६२ हजार लीड १ लाख मिळायला पाहिजे. विजयाचे फटाके फोडायला हा पठ्ठ्या येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना दिले.

हे ही वाचा:

IANS Matrize Survey: मोठी बातमी! महानिवडणुकीचा सर्वे आला समोर… महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss