परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि रणजित पाटील उपस्थित होते. शरद पवार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून म्हणाले की, ओमराजे मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. आता एक म्हातारा खांदयावर बसून आलेला पाहिला का? असेही पवार म्हणाले.
परांडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संविधान बदलण्यासाठी ४०० पार ची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला. तुम्ही आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी ३१ खासदार तुम्ही दिले आणि घटना वाचवायचं काम तुम्ही केल्याचे शरद पवार म्हणाले. ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. दुष्काळ तोंड देणारा, रोजगार हमीच्या कामावर जाणारा तुमच्यासारखा शेतकरी ऊस उत्पादन करतोय. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातील मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले. त्यासाठी आम्ही काम हातात घेतलं आहे. महाविकास आघाडीचे संघटन उभं केलं आहे. महिलांना अधिकार दिले की महिला काहीही करू शकतात. महिलांना संधी देण्यासाठी महालक्ष्मी योजना काढल्याचे शरद पवार म्हणाले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपला महाराष्ट्र गद्दाराच्या राजकारणाने पोखरला आहे असे वक्तव्य केलं. खोक्याच्या आमिषाने ईडीच्या भीतीने अनेकांनी पक्षाची साथ सोडल्याचे शरद पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत टेलिप्रॉम्प्टर आम्ही पाहिलं. पण कालच्या सभेत आम्ही लाईव्ह टेलिप्रॉम्प्टर पाहिलं. मागून प्रॉन्ट करत होतं, असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला.
हे ही वाचा:
धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंनी केला संतप्त सवाल, महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा?
तुम्हाला जर तुमचा चेहरा चमकदार करायचा असेल आणि वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही महिनाभर खा ‘हे’ फळ
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.