spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

चिंचवडला भिडलेत जगताप विरूध्द कलाटे, कोणाला मिळणार मतदारांची कलटी?

२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या अगोदरपासूनच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरवात केली होती. भारतीय जनता पक्षाने महायुतीकडून त्यांना चिंचवड विधानसभेचे तिकीट दिले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

चिंचवड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ, अनेक वर्षांपासून जगताप कुटुंबाचे वर्चस्व असणारा मतदारसंघ अशी चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे. २००९ पासून या मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे वर्चस्व आहे. यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि राहुल कलाटे त्यांच्यामध्ये रंगणार आहे. जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे देखील या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असले तरी खरी लढत ही जगताप आणि कलाटे यांच्यामध्येच रंगणार आहे. या भागावर सुरवातीपासून वर्चस्व असणारे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांची या मतदारसंघावर चांगली पकड होती. २००९ मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप अशी निवडणूक झाली होती, तेव्हा जगताप यांनी बारणे यांचा पराभव करून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून सातत्याने जगताप या मतदारसंघातून निवडून येत होते. २०१९ मध्ये देखील भारतीय जनता पक्षाने जगताप यांनाच तिकीट दिले होते, तेव्हा देखील त्यांनी राहुल कलाटे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. २०२२ मध्ये लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तेव्हा शिवसेनेकडून राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीकडून नाना काटे हे दोघेजण त्यांच्या विरोधात उभे होते, तेव्हा काटे आणि कलाटे यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली त्यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय सोपा झाला आणि त्या इथून आमदार म्हणून निवडून आल्या.

२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या अगोदरपासूनच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरवात केली होती. भारतीय जनता पक्षाने महायुतीकडून त्यांना चिंचवड विधानसभेचे तिकीट दिले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाना काटे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी नाना काटे यांची समजूत काढली, त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली. जगताप यांना उमेदवारी दिली म्हणून नाराज असणाऱ्या महायुतीमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शंकर जगताप यांनी त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जगताप आणि कलाटे त्यांच्यामध्ये सरळ लढत रंगणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघावर जगताप कुटुंबाचे २२ वर्षांपासून वर्चस्व राहिलेले आहे, त्यामुळे या निवडणुकीत जगताप यांचे पारडे जड आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे राहुल कलाटे हे सलग तिसऱ्यांदा जगताप कुटुंबाच्या विरोधात निवडणुक लढवत आहेत. पोटनिवडणुकीत काटे आणि कलाटे हे दोघेजण निवडणूक लढवत होते, त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. मात्र, या निवडणुकीत काटे यांनी माघार घेऊन जगताप यांना आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे कलाटे आणि जगताप यांच्यामध्ये होणारी लढत किती चुरशीची होणार हे पाहावे लागेल. हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका कंपनीत काम करणारा एक अभियंता चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, मतदार संघातल्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात हौसिंग सोसायट्या मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, अनेक ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागणे हे आव्हान असणार आहे. या बरोबरच अतिक्रमण, अवैध बांधकामे, असे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम नवनियुक्त आमदाराला करावे लागणार आहे.महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत या मतदारसंघात होणार असली, तरी यावेळी त्यामध्ये बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचारावर बंदी, नियमांचे उल्लंघन झाल्यास ECI करणार कडक कारवाई

विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत वारीस पठाण यांना अश्रू अनावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss