राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना वर्धेत घडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कारले मास्तरांनी केला आहे. या प्रकरणात व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. मारहाणाची घटना घडल्यानंतर कराळे मास्तरांनी तक्रार सावंगीच्या पोलीस स्टेशन मध्ये केली आहे. मारहाण वर्धा जिल्ह्याच्या मांडवा या गावात झाली. ते या गावातून मतदान करून परत येत असतांना झाली आहे.
मारहाण करणाऱ्यांनी कराळे मास्तरांना शिवीगाळ केल्याचाही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. तुम्हाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही असं सुद्धा कराळे मास्तर म्हणतांना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ती अशी अरेरावी करतात – कराळे मास्तर
या मारहाणी नंतर कराळे मास्तरांनी सावंगीच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या वर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी मतदान करून शांतपणे चाललो होतो. एकही शब्द बोलला नाही. पण समोरचा व्यक्ती माझ्या अंगवार आला. त्याने मला आईवरून शिव्या दिल्या, माझा कॉलर पकडला. भाजपच्या नेत्यांनी पोसलेली ही लोक माजलेली आहेत. ती अशी अरेरावी करतात.असं कराळे मास्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान