महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आज दि. २३ नोव्हेंबर झालेल्या निकालांमध्ये महाराष्ट्रात भाजपाची राजकीय त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील एकूण २८८ मतदारसंघापैकी तब्बल १३२ मतदारसंघामध्ये एकट्या भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. हे भाजपासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. शिंदे गटाचे उमेदवार ५४ तर अजित पवार गटाचे उमेदवार ३५ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यात महायुती सहजपणे सत्ता स्थापन करेल, हे आता जवळपास स्पष्ट आहे.
दुसरीकडे भाजप आणि महायुती च्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी अनेक फोन येत आहेत. भाजपाला महाराष्ट्रात मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजप मुख्यालयातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मतदारसंघाचे निकालाचे कल हाती लागले आहेत. २१८ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडी ५८ आणि इतर उमेदवार १२ जागांवर आघाडीवर आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३०, तर शिंदे गट ५४ आणि अजित पवार गटाचे उमेदवार ३४ जागांवर आघाडीवर आहेत. हे महायुतीसाठी सर्वात मोठे यश मानले जात आहे. तर महाविकास आघाडीची प्रचंड निराशा झाली आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande