महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी २० नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान पार पडले. आज २३ नोव्हेंबरला विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासाठी आज फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण राज्याची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, हे आज अखेर समजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढतीत कोण जिंकणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या मतदारसंघात झेंडा रोवणार हे पाहण्यासाठीही उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला काळात भाजपने बाजी मारल्याचं दिसत आहे.
पुढच्या काही तासात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होताच भाजप अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्प्यात भाजप वरचढ दिसत आहे. भाजपने अनेक मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
काय आहे सुरुवातीचा कल?
- परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर
- नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर
- जामनेरचे गिरीश महाजन आघाडीवर
- पुणे कंटोन्मेंट भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर
- जळगाव जामोद संजय कुटे आघाडीवर
- काटोलमध्ये चरणसिंह देशमुख आघाडीवर
- येवल्यात छगन भुजबळ आघाडीवर
- बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर
- अचलपूरमध्ये बच्चू कडू आघाडीवर
- चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर
हे ही वाचा:
Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.