महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघापैकी माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणून माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे. या तिरंगी लढतीत महेश सावंत आघाडीवर आहेत तर सदा सरवणकर आणि अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत. अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुंबईतील रंगतदार लढतींपैकी एक असलेल्या शिवडी मतदारसंघातील लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत.
मुंबईतील ३६ मतदारसंघापैकी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्ह्णून वांद्रे मतदारसंघ चर्चेत आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई, तसेच मनसेकडून तृप्ती सावंत मैदानात उतरल्या होत्या. आताच्या अपडेटनुसार वांद्रे पूर्व मतदार संघात ठाकरेंच्या वरुण सरदेसाईंनी आघाडी घेतली आहे.
वरळीमध्ये आदित्य ठाकरे ६९६ मतांनी घडीवर आहेत. तर मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर असून संदीप देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अणुशक्तीनगरमध्ये चौथ्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक आघाडीवर असून फाहाद अहमद हे पिछाडीवर आहेत.
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत.
बातमी अपडेट होत आहे.
हे ही वाचा:
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे आघाडीवर