spot_img
Wednesday, December 4, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Election Result 2024: महायुतीच्या यशावर Eknath Shinde यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election Result 2024: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (शनिवार, २३ नोव्हेंबर) स्पष्ट होणार आहे. राज्याच्या विधानसभेवर महायुती बाजी मारणार कि महाविकास आघाडी यश मिळवणार याचे उत्तर काहीच तासात स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितित म्हणजेच दुपारी १२ च्या दरम्यान महायुतीने बाजी मारल्याचे स्पष्ट होत असून बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे महायुतीला मात्र अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे विशेषतः लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले आहेत.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, “माझ्या लाडक्या बहिणींचे खूप आभार! लाडक्या बहिणींनी मतदान केले म्हणूनच हे घडलं. कामाची पोचपावती जनतेने निकालातून दिली. महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून धन्यवाद! महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी अश्या प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, समाजातील प्रत्येक घटकांनी भरभरून मतदान केले. गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केले. त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. जनतेचे पुन्हा आभार मानतो. सर्वाना धन्यवाद देतो,” असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss