राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. सर्वात आधी या निकालाबद्दल भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन केले पाहिजे. कारण अगदी चार महिन्यांपूर्वी असलेली विरोधातील परिस्थिती पलटवून ज्या पद्धतीने भाजपाने या निवडणुकीत कमबॅक केले, ते निश्चितच अभिनंदनीय गोष्ट आहे. या निकालांचे विश्लेषण करताना, विरोधी पक्षांना भाजपाची ताकदच समजलेली नाही, असं चित्र दिसतंय. अशातच बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाय हे ऐकायला देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पचणी पडणार नाहीये. पण हे खरं आहे की थोरातांचा पराभव झालेला आहे तोही संगमनेरमधून. तब्बल आठ वेळेस मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगलं जिव्हारी लागणार आहे. कारण १९८५ ते २०२४ अशा ४० वर्ष या मतदारसंघाचं आमदारकी भूषवलेल्या थोरातांना हा फार मोठा धक्का समजला जातोय.
१९८५ ते २०२४ असं ४० वर्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. त्यामुळे मतदारसंघातील लोकांना तोच तो चेहरा आणि तेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या विषयी नाराजी पसरली होती. त्यामुळे यंदा संगमनेरचा आमदार बदलावा अशी एक सुप्त लाट मतदारांमध्ये तयार झाली होती. त्या सुप्त लाटेचा परिणाम हा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवात झालेला पाहायला मिळतोय. यावेळी मतदारसंघातील सुप्त विरोधी लाट ही थोरातांचा पराभव करून गेली आहे असंच आता म्हणावं लागेल. यानंतरचा दुसरा मुद्दा येतो की, सुजय पाटील यांनी लावलेली फिल्डिंग, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला ४० वर्षांपासून राजकीय संघर्ष यंदाही पाहायला मिळतोय. सुजय विखे यांचा लोकसभेत झालेल्या पराभवामुळे सुजय विखेंनी आपला मोर्चा हा संगमनेर मतदारसंघाकडे वळविला होता. संगमनेरमध्ये सुरुवातीपासून सुजय विखेंनी जातीने लक्ष घातलं होतं. अगदी संगमनेरमधील गल्ली बोळ्यात सुजय विखेंनी सभा घेतल्या होत्या, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी विखेंनी मोठी फिल्डिंग लावली होती. यांच्या लावलेल्या फिल्डिंगमुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय असं म्हटलं जातंय, त्यामुळे कधीही पराभवाची धूळ न खाल्लेल्या थोरात घराण्याला यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याकडून पराभवाला सामोर जावं लागलंय.
बाळासाहेब थोरात यांची संगमनेरच्या राजकारणात तयार झालेली घराणेशाही बाळासाहेब थोरात यांनी १९८५ पासून सलग ४० वर्ष संगमनेरची आमदारकी काढली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नवीन कार्यकर्त्यांना ४० वर्षात निवडणुकीची संधीच मिळाली नाहीये. यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठा वर्ग हा बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराज होता. तसेच अगदी स्थानिक पातळीवर देखील थोरात यांच्या बहीण दुर्गाबाई तांबे या बऱ्याच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करत होत्या. त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघ त्यांचेच मेहुणे सुधीर तांबे यानंतर भारतीय सत्यजीत तांबे हे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. अलीकडे काही वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांची जागा घेण्यासाठी त्यांची मुलगी जयश्री थोरात या देखील राजकारणात सक्रिय झाल्यात यामुळे थोरात यांच्यानंतर थोरात यांचे राजकारण जयश्री थोरात चालवतील असंही मतदारसंघात चर्चा होती. यामुळे मतदारसंघातील लोकांना थोरातांच्या या घराणेशाही विषयी चीड निर्माण झाली होती, त्यामुळे या घराणेशाहीच्या कारणामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असे देखील मतदारसंघात चर्चा सुरू झाल्यात. तर या चार कारणांमुळे बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमध्ये करेक्ट कार्यक्रम झालाय असंही बोललं जातंय.
हे ही वाचा:
Maharashtra Election Result 2024: मास्टर माइंड Devendra Fadnavis पुन्हा एकदा भाजपचा हिरो
शरद पवारांचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने मारली बाजी तब्बल इतक्या जागांवर मिळवला विजय…