महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून मतदारांनी महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणीचा भरूभरून आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून दिसून आलं आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने कौल दिला असून महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली. महायुतीने २०० पारचा नारा दिला असून राज्यात युतीचा वारू चौखूर उधळला आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांचे कौल स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकास आघाडीला एकत्र मिळालेल्या जागाही अत्यंत कमी आहेत.
जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.संपूर्ण राज्यात राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
मात्र विरोधकांकडून यावरून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती. आणि हेच खरे ठरताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला झाल्याचं दिसत आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं चित्र या निवडणुकीत दिसलं.
हे ही वाचा:
Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande