Maharashtra Assembly Election 2024: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या मतदानाचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेले साडेचार टक्के मतदान हे आपल्याच पक्षाच्या बाजूने असल्याचा दावा, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईकर मतदाराने शिवसेनेच्या कोणत्या गटाला पसंती दिली आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. आणि आता अवघ्या काही तासांत निकाल हा समोर येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो, अथवा मुंबईतील आमदारांचे संख्याबळ असो, मुंबई नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिली आहे. अश्यातच शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ही पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिंदेसेनेला केवळ एक जागा राखता आली. उद्धवसेनेला मात्र मुंबई शहरातील तीन जागा जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरात मिळून उद्धवसेनेने २२, तर शिंदेसेनेने १४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या विधानसभा निवडणुकीत वाढलेले साडेचार टक्के मतदान हे आपल्याच पक्षाच्या बाजूने असल्याचा दावा, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईकर मतदाराने शिवसेनेच्या कोणत्या गटाला पसंती दिली आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाढलेला टक्का कोणाला धक्का देतो व कोणाला सत्तेवर आणतो, हे आणखी २४ तासांत स्पष्ट होईल. तरीदेखील दावे-प्रतिदावे केले जात आहेत. वाढीव मतदान शक्यतो सत्तांतराचे चिन्ह असते, असे सांगत महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा केला जातो आहे. या उलट वाढीव टक्केवारी नेहमीच भारतीय जनता पक्षासाठी फायद्याची असते, असा महायुतीचा दावा आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत त्याचेच प्रतिबिंब आहे असा विश्वास शिंदे सेनेकडून व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मुंबईत मतदानाचा वाढलेला टक्का हा महिलांचा आहे. महायुतीने हा लाडकी बहीण योजनेचा परिणाम म्हटले असले तरी महाविकास आघाडीने आम्ही मांडलेल्या महालक्ष्मी योजनेला मिळालेला हा प्रतिसाद आहे किंवा भडकलेल्या महागाईचा प्रातिनिधिक विरोध आहे असा विश्वास उद्धवसेनेने व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान