विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासात लागणार आहे. मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही विजयाचा दावा केला आहे. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. या प्रतिक्रियेवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘नवरीचा पत्ता नाही आणि हॉल घेतलाय, बैंडबाजा आलाय. सगळं आहे पण सत्ता कुठे आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केली.
नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. बाळासाहेब ठाकरे असताना १९९५ ला आम्ही सत्तेत गेलो. आता वर्चस्व कुठे आहे? थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांना रस्त्याने चालणे कठीण होईल, असा टोलाही राणे यांनी लगावला. ‘आम्ही येतोय, हे सगळा दिखावा आहे. आता निकालाला काही तास शिल्लक आहेत, बघूया. सत्ता स्थापनेची राऊतांना घाई लागली आहे. आमची महायुतीच सत्तेवर येणार आहे. भाजपाच्या सर्वात जास्त जागा असतील, असंही नारायण राणे म्हणाले.
पुढे बोलले, महाविकास आघाडीतील नेते एकत्र येतील का नाही हे माहित नाही. शरद पवार कोणत्या ट्रॅकवर जातात हे पाहिलं पाहिजे. शरद पवार कोणत्या क्षणी आमदारांच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेतील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस मंत्रालयात गेले होते. महाविकास आघाडी जास्त काळ टीकणार नाही. यांच्यात विरोधी पक्ष नेता होईल असं कोणीही नाही, असंही राणे म्हणाले. संजय राऊत यांचे बोलणे म्हणजे लोकांच्या हिताचे नाही, ते सगळं वाईटच बोलत आहेत. ते त्यांच्या आयुष्यात संतुष्ट नाहीत. ते तुरुंगात जाऊन आले आहेत, अशी टीका राणे यांनी राऊतांवर केली.
राज्यात महायुतीचे सरकार येईल. शरद पवार कुठल्याही ट्रॅकवर जाऊ शकतात. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीत ठरला जाईल, असंही राणे म्हणाले.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान