राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. सर्व पक्षाकडून राजकीय नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandakant Patil) यांच्यावर तुफान टीका केली आहे.
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. ‘चंदू पाटलाला मत दिलं तर गल्लोगल्ली गावोगावी गुंडगिरी वाढेल,’ असे वक्तव्य करत गावोगावी गुंड पोसले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
“मारामारी गुंडगिरी करण माझं पिंड नाही, मी 40-45 वर्षे झालं विधानसभा क्षेत्राचं काम करतो या कालावधीमध्ये कोणालाही दमबाजी केल्याचं माझं एकही उदाहरण नाही, कुठेही भ्रष्टाचार केल्याचं माझं एकही उदाहरण नाही, कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरण नाही, मी गेल्या मागील पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये माझ्या भाषणात सांगितलं होतं जर तुम्ही या चंदू पाटलाला निवडून दिलं तर गल्लोगल्ली गावोगावी गुंडगिरी वाढेल, आज गावोगावी गुंड पोचले जात आहेत पाच ते दहा गुंड प्रत्येक गावात पोचले जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“संवेदनशील मतदान केंद्राची यादी मी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे त्या निवडणूक केंद्रांवरती कडे कोट बंदोबस्त ठेवावा अशी मागणी मी निवडणूक आयोगाला केलेली आहे , हा आमदार बाहेरून आला म्हणजे चाळीसगाव चा माणूस मुक्ताईनगर मध्ये येऊन आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आता चाळीसगावला परत पाठवायचा आहे,” असा टोला एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना लावला आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…