महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप, शिंदेची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीसह नव्याने बनलेल्या महायुतीला मोठं यश मिळालं. लोकसभेतील निकालानंतर महायुती अधिक सावध आणि सतर्क झाली आणि याच निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मैदानात उतरली. सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेने या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांनी याच योजनेवर मोठं प्रचार केलं. त्यात, अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षातील नेत्यांसोबत सामान्य कार्यकत्यांना जोडून महिलांना आकर्षित केलं. यावेळी अजित पवारांच्या मिडिया कॅम्पेनिंगमध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रचार देखील त्याच माध्यमातून करण्यात आला.
महायुतीची सरकार स्थापन होणार आहे हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री कोण होईल याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहे. आज एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचा चित्र दिसलं. महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्यामुळे महायुतीचे प्रमुख नेते एकमेकांची भेट घेऊन अनेक लोकांना शुभेच्छा देत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही नेत्यांकडून, आमदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजित पवार यांच्या निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांचा विजय साजरा करत त्यांची भेट घेतली. आणि या वेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावरून वाद निर्माण झाला. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत, थेट त्यांना “पगारी शिपाई” असल्याचं म्हटलं. तसेच, एका वर्तमानपत्रात लेख लिहिताना, “यशाचं डिझाईन राष्ट्रवादीचं” असा टोलाही लगावला. त्यावर, पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना चांगलंच झापलं आहे. पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना मीडिया समोर बाईट देऊ नये, असा इशारा देखील दिला.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule