spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

PM Modi Live: देशाला कमकुवत करण्याची एकही संधी MVA आणि Congress सोडत नाही, पंतप्रधानांचा आरोप

काँग्रेस (Congress) आणि आघाडी देशाला मागे टाकण्याची आणि देशाला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नसल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेत केला. भाजपमुळे राज्याची प्रगती होत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे काय निकाल लागणार आहेत हे तुम्ही आजच दाखवून दिले आहे. जनतेची गर्दी हे सांगत आहे की, महाराष्ट्रात महायुती प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. चिमूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे की “भाजप – महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे.” असे मराठीत बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सभेत भाष्य केले.

महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी आपल्याला शेतकरी समृद्ध करावा लागेल. आज येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. महायुती सरकारही नमो शेतकरी योजनेचा दुहेरी लाभ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आज मी तुम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एका मोठ्या षडयंत्राबद्दलही इशारा देत आहे. आपल्या देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे १०% आहे. काँग्रेसला आता आदिवासी समाजाला जातींमध्ये विभागून कमकुवत करायचे आहे. आमच्या आदिवासी बांधवांची एसटी म्हणून असलेली ओळख नष्ट व्हावी, त्यांनी त्यांच्या ताकदीने निर्माण केलेली ओळख मोडीत काढावी, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले.

तुमची एकजूट तुटली तर हा काँग्रेस (Congress) चा धोकादायक खेळ आहे. आदिवासी समाज जातींमध्ये विभागला गेला तर त्याची ओळख आणि ताकद नष्ट होईल. काँग्रेसच्या राजपुत्रांनी स्वतः परदेशात जाऊन याची घोषणा केली आहे. म्हणूनच मी म्हणतो की, काँग्रेसच्या या कारस्थानाला बळी पडण्याची गरज नाही, एकजूट राहिली पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो: जर आपण एकसंध राहिलो तर आपण सुरक्षित राहू, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss