लोकसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणुक मोठी चुरशीची आणि चर्चेची ठरलेली दिसून येत आहे. संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. जे पहिले कल हाती लागले त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की,”ज्या पक्षाच्या जागा असतील त्यानाच मुख्यमंत्री होईल. भाजपच्या जागा जास्त येत आहेत हे दिसून येत आहे. आमच्या जवळपास १२५ जागा येतील त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी होय असे उत्तर दिले.
शिवसेना कुणाची खरी, कुणाची खोटी याबाबतचा निकाल जनतेने दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जी पार्टी मोठी आहे, तत्यानाच मुख्यमंत्री होतो. भाजप १२५ जागांजवळ गेली आहे, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी ‘हम सब एक है’ चा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रवीण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल. असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असे दरेकर म्हणाले.
हे ही वाचा:
Maharashtra assembly election results 2024: माहीम मतदारसंघात कोण आघाडीवर?