विधानसभा निवडणूकाचे वारे वेगाने वाहत आहे आणि प्रचार सभेला सुरुवात झाली आहे. सर्वे पक्ष नेते आपल्या आपल्या मतदारसंघात प्रचार सभा करत आहे. फक्त ७ दिवस बाकी आहे मतदानासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेला मतदार संघ कल्याण आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना-यूबीटी गटाकडून सुभाष भोईर यांना तिकीट देण्यात आले आहे. राजेश मोरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. तर मनसे कडून राजू पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. २०१९ मध्ये राजू पाटील हे आमदार झाले होते. राजू पाटील यांची मुलाखत टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली आहे.
या वेळेस टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी मनसे उमेदवार राजू पाटील यांना ‘राज ठाकरे यांच्याकडुन येणाऱ्या ५ वर्षांमध्ये तुमच्या काय अपेक्षा आहे’ असं विचारण्यात आल्यावर ते बोलले राज ठाकरे यांचं व्हिजन तर त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे विकास आराखडाच्या ब्लू प्रिंट काढलेल्या आहे. मी पण आज जाहीर नाम्यात टाकलेला आहे. कि मुंबई आणि महाराष्ट्राचे रेल्वेचे स्वतंत्र बोर्ड असलायला पाहिजे. हा मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी उत्तर भारतीय अधिकारी असतात तिकडे जाऊन त्यांना काही पडलेली नसते. उत्तर भारतीय असो किंवा मराठी असो त्यांना दिल्लीच्या आदेश ऐकायची सवय झालेली असते. प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी जाते. त्यांच्या साठी काही ठोस करायचं असेल तर ते त्या माध्यमांतून करायचं असत. आणि राज साहेब महाराष्ट्राच्या बाबतीत अगदी त्यांचा स्पष्ट व्हिजन आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झाला तर ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ ही एक टॅगलाईन घेऊनच ते चाललेले आहेत. तुम्ही लोक इतर सर्व लोक सतत बोलत असतात कि राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा हीच त्यांची भूमिका आहे आणि याच्या साठी बिटवीन द लाईन जर काही घडामोडी होत असतील किंवा जे काही राजकारण होत असतील आली तर ते त्याच्या कधी भूमिके पासून बाजूला झाले आहेत का. तर त्याच्या कडून खूप अपेक्षा आहेत आमलापण आहेत. आणि ते करतील असं आम्हाला वाटते.
पुढे ते बोलले शिंदे सरकार पण आता पालिका लेव्हलला चालवत आहे. त्यामुळे त्यांच्या कडून जास्त काही अपेक्षा नाही आहेत. कारण या रेवडी संस्कृती जे आपण बोलतो ती त्यांच्या कडून अपेक्षित नव्हती. तुम्ही विकास करून दाखवा लोकांना. तुम्ही डोंबिवलीत फिरा टॅक्स पे करणाऱ्या लोकांना विचार, लाडकी बहीण योजना हि त्यांच्या साठी आणली आहे ते पैसा यांच्या घरातला नाही आहे ना. टॅक्स पे करणाऱ्यांचे पैसे आहेत, बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणि द्या ते हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या. त्यांच्या साठी दुसरं काही सबळीकरण करायचं असेल तर करा. आम्हाला फक्त राज साहेब कडून अपेक्षा आहेत. बाकी कोना कडून अपेक्षा नाही. अशी टीका त्यांनी शिंदेंवर मुलाखतीत केली.