राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्व उमेदवार, पक्ष प्रचार सभा करत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षाचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हंटल्या जाणाऱ्या मतदार संघात शिवसेना-यूबीटी गटाकडून सुभाष भोईर यांना तिकीट देण्यात आले आहे. राजेश मोरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. तर मनसे कडून राजू पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी टाईम महाराष्ट्राला एक्सक्लुसिव्ह मुलखात दिली. या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.
टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली. त्यांनी राजू पाटील यांना “तिरंगी लढतीचा विचार जर केला तर तुम्ही विद्यमान आहात त्यामुळे तुमचा क्रमांक पहिला असेल, सुभाष भोईर ते स्वतः अनुभवी आहेत. ते स्वतः सिडको चे संचालक होते, ते अध्यक्ष होते ते आमदार होते ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते ही भूमिपुत्र आहे आणि राजेश मोरे अशी ही तिरंगी लढत आहे. आणखी एखादी जर काही छोटे मोठे काही उमेदवार असतील तर ही तिरंगी लढत असणार की दुरंगी लढत असणार. तुम्ही आणि सुभाष भोईर असणार की काय असणार नेमकं.” असं विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिला आहे.
उत्तर- लढत ही लढत असते. तिरंगी दुरंगी असं समजू पण नये, कोणाला हलक्यात घेऊ पण नये. विजय हा एका मताने झाला काय आणि लाख मताने झाला काय विजय हा विजय असतो. या मताचा मी आहे. २००९ ला पण माझे भाऊ आमदार होते तेव्हा ही लढत एकत्रित शिवसेनेची होती. आताही तशीच आहे. इथला पारंपरिक समोर येणारा उमेदवार हा शिवसेना आता विभागला गेला आहे. परंतु त्यात सुभाषदादा भोईर हे माझी आमदार होते. राजेश मोरे नगरसेवक आहे आणि त्यांचा इकडे तसा काही वावर जास्त नव्हता. साहजिकच आमदार असल्यामुळे हे मतदारसंघात पॉवर तेव्हा असायचं त्यामुळे शक्यतो आता जे दिसत आहे. आम्ही जे बघितलं त्यामध्ये सुभाष दादा भोईर मध्ये पाहिजे ती लढत दिसतेय. राजेश मोरे मध्ये एवढी काही लढत दिसत नाही. त्यांच्यात कुठे तरी नाराजी दिसली. त्यामुढे लढत तिरंगी होईल, परंतु दोघे आम्हीच असू पहिले. असे राजू पाटील यांनी सांगितले.