Raju Patil Exclusive: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वे उमेदवार, पक्ष प्रचार सभा करत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षाचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हंटल्या मतदार संघात शिवसेना-यूबीटी गटाकडून सुभाष भोईर यांना तिकीट देण्यात आले आहे. राजेश मोरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. तर मनसे कडून राजू पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी टाईम महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलखात दिली. या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.
टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी ही एक्सक्लुसिव्ह मुलखात घेतली. त्यांनी राजू पाटील यांना “कल्याण, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणच्या विकासाला हातभार लागला का? आणि तुम्हाला श्रेय मिळत नाही आहे का? असं विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.
उत्तर – नाही मला श्रेय नकोच आहे. ज्या गोष्टी मी बोलतोय, त्या ते घेऊन येतात ना. पहिला कोण बोलतोय किंवा कोण काम सुचवतोय.अनेक अश्या गोष्टी आहेत. आता उंबरलेची टेकडी आहे. या आधी पण खासदार होते. कधी सुचलं नाही. त्याच नाशिकच्या धरतीवर बॉटनिकल गार्डन व्हावं हि माझी मागणी होती. मी तो निधी आणला त्याचेही श्रेय ते घेते, घेउ देत. अनेक अशे रस्ते जे मी सुचवलेले ते आणले. त्यांनी त्याचे श्रेय घेतात, घेऊ देत. मला जो फरक पडतो मी तर बोलतो. रेल्वे समांतर रस्ता करा. तुम्ही डोंबिवली, दिवा, मुंब्रा, त्याच श्रेय घ्या. मी स्वतः पाठी लावीन उभा राहून. मी अश्या कामांना विरोध करणारा किंवा श्रेय घेणाऱ्या वृत्तीचा माणूस नाहीये. यांनी MIDC रस्ते बनवले नव्हते. त्या वेळेस मी यांच्या टीकेवर टीका केली. यांच्या नावाचे अभिनंदनाचे उलटे बॅनर लावले. पण उदघाटनाच्या वेळेस शिंदे साहेब बोलले की राजू आता आमच्या अभिनंदनाची लाव. मी म्हंटल नक्की लावणार, आणि दुसऱ्या दिवशी लावले मी. हे काय माझं वैयक्तिक काही नाही. मला बाळ कडू पाजण्याऐवजी यांना कडू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट येतो. शिंदे साहेबांचा स्वभाव आणि यांचा स्वभाव जमीन आसमानाचा फरक आहे. शिंदे साहेब दिवसाला माणसं जोडत असेल तर हे तोडत आहे, हे सत्य आहे. परंतु काय आहे,आता स्वभावाला औषध नसतो. तिसऱ्यांदा आता खासदार झाले, हळूहळू बदल होईल. त्यांच जेव्हा काम असत तेव्हा गोड तेही वागतात नाही असं नाही. लोकसभेला खूप गळ्यात गळे घालून फिरलो.असे राजू पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…