spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

डोंबिवली मतदारसंघातून Ravindra Chavan आणि Dipesh Mhatre आमने सामने

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते असल्याने फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मोठा विकासनिधी आणला. फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून तर शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जोरदार विकास काम केली. शहरातील रस्त्यावरील शिळफाटा रोडच्या रुंदीकरणासाठी निधी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधासाठी चव्हाणांनी मोठा निधी आणलाय.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातला भाजपचा हक्काचा बालेकिल्ला. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत संघ विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळं इथला मतदार हा कायमंच भाजपच्या पाठीशी राहिल्याचं सांगितलं जातं. २००९ ला मतदारसंघ तयार झाल्यानंतर इथे रविंद्र चव्हाणांचाच बोलबाला आहे. नगरसेवक, आमदार ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास राहिलेल्या रविंद्र चव्हाण यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत इथे मोठा जनसंपर्क वाढवलाय. त्यामुळं त्यांचं आव्हान मोडून काढणं इतकं सोपं नसल्याचं सांगितलं जातं. पण तरीही दिपेश म्हात्रे यांच्या हाती मशाल देऊन उद्धव ठाकरेंनी जागा रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण रेस सुरू होण्याआधीच विकासकामांच्या जोरावर रविंद्र चव्हाण विक्टरी स्टँडच्या पहिल्या नंबरवर असतील अशी चर्चा होतेय.

डोंबिवली विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर इथे गेल्या तिन्ही निवडणुकामध्ये रवींद्र चव्हाण यांना पडणाऱ्या मतांचा आलेख चढता राहिला. तसेच मराठी कोकणी आगरी ब्राह्मण गुजराती उत्तर भारतीयांची भाजपच्या चव्हाण यांना साथ असल्यास सांगितले जातय. पण इथून लढण्यासाठी शिंदें शिवसेनेचे असलेले दिपेश म्हात्रे यंदा इच्छुक होते. पण ही जागा चव्हाण यांना सुटल्यावर नाराज असलेल्या दिपेश म्हात्रेंना ठाकरेंनी पक्षात घेतलं आणि रवींद्र चव्हाण यांना इनसिक्योर करण्याचा प्रयत्न केला. आता म्हात्रे हे मुख्यमंत्री शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या जवळ असणारे नेते. शिंदे आणि चव्हाण यांच्यात सुप्त संघर्ष असल्याने म्हात्रेंचं चव्हाण विरोधातच राजकारण राहिली. २०१४ ला शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले तेव्हा शिवसेनेच्या तिकिटावर दिपेश म्हात्रेंनी इथे ३८ हजाराच्या आसपास मतदान घेतल होतं त्यामुळे कट्टर विरोधकाला चव्हाण विरोधात उतरवण्याचा डाव ठाकरेंनी खेळला, पण तो डाव वर्कआउट होणार का हा मोठा प्रश्न आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ तयार होण्याआधी कल्याण युवा मोर्चा उमेदवारांची उपजिल्हाध्यक्ष म्हणून भाजपने रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी दिली तेव्हापासून त्यांनी लोकांपर्यंत पोहचायला सुरुवात केली. त्यांच्या या कामांमुळे २००५ मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेतून निवडून आले. ते २००७ ला स्थायी सभापती झाले आणि त्यांनी कल्याण डोंबिवली शहरात आपल्या कामांच्या जोरावर कनेक्ट वाढवला आणि त्यांची रवी दादा अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि २००९ मध्ये डोंबिवली मतदार संघात संधी मिळाल्यावर चव्हाण यांनी बाजी मारली त्यानंतर सलग तीन वेळा निवडून येत त्यांनी हैट्रिक सुद्धा केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते असल्याने फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मोठा विकासनिधी आणला. फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून तर शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जोरदार विकास काम केली. शहरातील रस्त्यावरील शिळफाटा रोडच्या रुंदीकरणासाठी निधी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधासाठी चव्हाणांनी मोठा निधी आणलाय. तसेच डोंबिवली रेल्वे स्टेशन सुधारणा प्रस्ताव आणि मेट्रो प्रकल्पासाठी चव्हाणांनी पाठपुरावा केल्यास सांगितले जातं. थोडक्यात डोंबिवली मध्ये चांगली कनेक्टिविटी देण्यासाठी चव्हाणांनी प्रयत्न केल्याची मतदार संघात चर्चा आहे. तसेच माणसांसोबत चव्हाणांनी डोंबिवलीतल्या संस्थाही जोडल्यात. तर डोंबिवलीतल्या राजकीय समीकरणांचं बोलायचं झालं तर मराठी भाषिक मतदार हा मनसेला साथ देताना दिसून आलाय. पण यावेळी मनसेने उमेदवार दिलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची आणि रवींद्र चव्हाण यांची मैत्री असल्याचं सांगितले जातय. दोघेही एकमेकांच्या शेजारी असल्याने ते राजकारणात ही शेजारधर्म पाळत असल्याचे बोलल जाते. कल्याण ग्रामीणमध्ये चव्हाणांना मदत मिळावी म्हणून यावेळी मनसेने डोंबिवलीतुन उमेदवार दिला नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे इथे मनसेचा मतदार चव्हाणांच्या बाजूने शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

आता दुसरीकडे ठाकरेंचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्याबद्दल बोलायचे झालं तर युवासेने ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून दिपेश म्हात्रे यांनी काम केलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते तीन टर्म नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती होते. पण शिवसेनेत पडलेल्या पक्षफुटीनंतर त्यांनी शिंदे गटात येत थेट आदित्य आणि उद्धव ठाकरेवर टीका केली. ते श्रीकांत शिंदेचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांनी मशाल हाती घेणे हे धक्कादायक होतं. पण त्यांच्यासोबत शिंदें सेनेचे पदाधिकारी ही त्यांच्या सोबत येतील आणि ठाकरे गटाची इथली ताकद वाढेल असं बोलल जात होतं. शिंदेचे १२ पेक्षा जास्त नगरसेवक आपल्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला होता पण दिपेश यांच्यासह त्यांचे बंधू आणि दोन माजी नगर सेविका ठाकरे गटात आल्या. भाजप शिवसेनेसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी दिपेश यांनी घेतल्या होत्या. या सर्वांनी दिपेश यांना समर्थन देण्यास नकार दिल्याचं दिसून आलं. तस त्यांच्या पक्ष प्रवेशाला ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात विरोध होता. दिपेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेनापदाचा राजीनामा दिला. दिपेश म्हात्रे यांची जमेची बाजू म्हणजे पक्षफुटीमुळे नाराज असलेले ठाकरे गटाचे केडर त्यांच्यामागे उभे राहू शकतं. त्यातच स्थायी समिती सभापती आणि तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे शहरी भागात त्यांनी आपलं प्रस्थ निर्माण केलय. डोंबिवलीतील वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, एमआयडीसीला लागत असलेल्या आगी या मुद्द्यावरून ते सध्या चव्हाण यांच्या विरोधात प्रचार करत असल्याचे दिसतय. तसेच मतदार संघात कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यांचे काम पूर्ण न झाल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरलाय. पण रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीकरांसाठी केलेली रस्ते आणि इतर विकासकामे, संघ आणि भाजपच्या मतदानाची त्यांना असलेली साथ आणि मनसेच्या मतदानाची बेरीज यामुळे सध्यातरी इथे रवींद्र चव्हाण यांची हवा असल्यास सांगितले जातंय. तर म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे यांचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता सोडून गेल्या ठाकरेंनी दिपेश म्हात्रे यांच्या हाती मशाल दिली असली तरी मशालीखाली अंधार पसरल्याचं दिसून येतंय. रवींद्र चव्हाण डोंबिवली विजयाचा सिक्सर मारणार की दिपेश म्हात्रे त्यांच्या समोर आव्हान उभ करणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली, म्हणाली “लाडकी बहीण…”

Bala Nandgaonkar यांनी उद्धव ठाकरेंना घातली साद; म्हणाले, “राज ठाकरे मनातून फार…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss