spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

प्रभादेवीच्या सभेतून Sandip Deshpande यांनी केले मोठे वक्तव्य

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच आज दि.१० नोव्हेंबरला माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली.

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच आज दि.१० नोव्हेंबरला माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली.

माहीम मतदारसंघात घेतलेल्या अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी वरळी मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले संदीप देशपांडे यांनी सर्व मान्यवरांना अभिवादन करत म्हणाले की, गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये अनेक घडामोडी या माहीम विभागामध्ये घडत होत्या. हा माहीम विभाग चर्चेचा विषय बनला. याचं महत्वाचं कारण म्हणजे अमित ठाकरे यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली. त्यानंतर पूर्ण मुंबईतील हॉट सीट माहीम मतदारसंघ झाला होता आणि बाकीच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले होते. आणि हे दुर्लक्ष होतंय म्हणून काही लोकं नाटकं करत होती. त्यातला हा एक माहीम प्रभादेवीचा आमदार. माझ्यावर राजसाहेब अन्याय करणार नाहीत, मला राजसाहेब लढायला देतील. तुला पहिली गोष्ट मागे घ्यायला कोणी सांगितलं होतं, हे पहिले एकदा लोकांना सांग. या इथे बसलेल्या सर्वांनी तुला जायला सांगितले होते का ? तू उमेदवारीचा अर्ज भरू नकोस. तू आमदारकी लढू नकोस. एक स्टेटमेंट दाखवायचे होते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही माहीत होते की आता काय सदा सरवणकर निवडून येत नाही. आणि आपण निवडून येत नाही म्ह्णून प्रसिद्धी करण्यासाठी ही सर्व नाटकी आहेत. हास्यजत्रेमध्ये जसे कलाकार आपल्याला हसवतात तसे काहीजण आपल्याला हुकमी रडवतात. त्यातले एक नाव म्हणजे सदा सरवणकर. हुकमी रडणारा माणूस. त्यांनी पाच वर्षे काही काम केले नाही म्हणून निवडणूक लागायच्या आधी १५ हजार कुकर वाटले. एवढी कामं केली होती तर कुकर वाटायची गरज का होती. सगळया कुकरवाल्या शिट्ट्या त्याच्यामागे शिट्ट्या घेऊन फिरतायेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss