Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा लवकरच होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) पत्रकारांशी संवाद साधत यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “हा निर्णय शेवटी दिल्लीतून होणार, खऱ्या अर्थाने हा निर्णय महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे. या निवडणुकीत आम्ही आम्ही पथ्य आणि परंपरा पाळली. मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवणार. हा निर्णय आज उद्या जाहीर करावाचं लागणार नाही. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, बहुमतासाठी त्यांना हात पसरावे लागणार नाही. दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवेल तो स्वीकारावा लागेल.”
मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याविषयी बोलताना ते म्हणाले, “यावर मी बोलणार नाही मात्र शब्द पाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही. आता कदाचित त्यांना महाराष्ट्राशी वैर घ्यायचं असल्यामुळे ती अशी कोणतीही भूमिका घेऊ शकतात.”
कधी होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी?
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल अशी चर्चा आधी रंगली होती. मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात महायुतीचे सरकार बहुमत मिळवून विजयी झाल्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे. त्यानंतर अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर योग्य निर्णय घेऊन या तीनही नेत्यांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे २७ किबवा २९ नोव्हेंबर रोजी सत्तास्थापना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”