Sharad Pawar on PM Narendra Modi : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ११ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे. अश्यातच सद्रव नेतेमंडळींनी प्रचाराचा धडाका हा लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा हा दिला होता. तेव्हा विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. भाजपला बहुमत मिळालं तर हे संविधान बदलतील, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. यावर आजच्या जळगावच्या सभेत शरद पवार बोलले आहेत. शरद पवार यांनी घटना बदलण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय.
चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार या दोघांना सोबत घेऊन केंद्रात सरकार स्थापन केले. काय केलं सत्ता .कोणत्या निर्णय घेतले. काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱ्यांची काय आहे देशातल्या तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे. एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याच्या मालाला किंमत देत नाही… जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादननुसार नाव मिळत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला एक जागा होती आणि राष्ट्रवादीला जागा होती. यावेळी ४८ पैकी ३१ जागा तुम्ही निवडून दिल्या. त्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचे पाप मोदींना करता आलं नाही, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे ४०० खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र ४०० जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली… त्यासा ठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाच्या आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही, असं शरद पवार म्हणालेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…