spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Sharad Pawar : भरसभेत शरद पवार म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याच्या वर वाढवायची का?

शरद पवार (Sharad Pawar) हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी हे या सभेला उपस्थितही होते. या सभेमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा यावर भाष्य करण्यात आल. शरद पवार यांनी आता यावर आपलं मत मांडलं आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. शरद पवार म्हणाले; काल पासून आमच्या प्रचाराची सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्यावतीने मी स्वतः उपस्थित होतो. शरद पवार हे नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ‘मी दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. शरद पवारांनी सांगितलं की नागपूरला तीन सभा घेणार आहे. “मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे, परिवर्तन पाहिजे आहे. आत्मविश्वास वाढवायचं काम आम्हाला करावा लागेल. आम्ही सर्व सहकारी आजपासून ठिकठिकाणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. असं शरद पवार म्हणाले.

काल (Sadabhau Khot) सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? त्यावर शरद पवारांना विचारलं असता, त्यांनी बोलणं टाळलं. भाजपात ज्या नावाची मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते, तो होत नाही, असं तावडे म्हणाल्याच पत्रकारांनी विचारलं त्यावर याची अंतर्गत माहिती त्यांना अधिक आहे असं उत्तर शरद पवारांनी दिल आहे.

आरक्षणावर शरद पवार काय म्हणाले : काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना होणार. आरक्षणाची मर्यादा तोडून ५० टक्क्यांवर न्यायची वेळ आली आहे. यावर शार पवार म्हणाले की, “मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. आम्ही तीन वर्षांपासून जातीय जनगणनेची मागणी करत आहोत. ती झाली पाहिजे, यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. हे आल्या नंतर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल”.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावरून Raj Thackeray यांचा Manoj Jarange यांना टोला; म्हणाले, “तुम्हाला लढायचे लढा नाही तर…”

अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss