spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद तर गडचिरोली मतदानात अव्वल

मुंबई : राज्यातील २८८ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजला पासून मतदान सुरु झालं असून दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढ दिसून येत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघाच्या ३६ जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले असून मतदाराचा उत्साह शेवटच्या टप्यात अधिक दिसून आला. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे गडचिरोली जिल्ह्यात झाले असून सर्वात मतदान ठाणे जिल्ह्यात झाले आहे. गडचिरोलीत ६९.६३ आणि ठाणे जिल्ह्यात ४९.७६ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यत ५८.२२ टक्के मतदान झालं आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं असून गडचिरोलीत ६९.६३ टक्के मतदान झालं आहे.

त्यानंतर, भंडारा जिल्ह्यात ६५.८८ टक्के मतदान झालं असून गोंदिया जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात ६५.०९ टक्के मतदान झालं आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक कमी मतदानाचा विचार केल्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ४९.७६ टक्के एवढे कमी मतदान झालं आहे. मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं असून गडचिरोलीत ६९ .६३ टक्के मतदान झालं आहे. त्यानंतर, भंडारा जिल्ह्यात ६५.८८ टक्के मतदान झालं असून गोंदिया जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात ६५ .०९ टक्के मतदान झालं आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक कमी मतदानाचा विचार केल्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ४९.७६ टक्के एवढे कमी मतदान झालं आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ४७.८५ टक्के,
अकोला – ४४.४५ टक्के,
अमरावती -४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड – ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे – ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया -५३.८८ टक्के,
हिंगोली – ४९.६४टक्के,
जळगाव – ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर _ ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर – ४४.४५ टक्के,
नांदेड – ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक -४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे – ४१.७० टक्के,
रायगड – ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली – ४८.३९ टक्के,
सातारा – ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
सोलापूर -४३.४९ टक्के,
ठाणे – ३८.९४ टक्के,
वर्धा – ४९.६८ टक्के,
वाशिम -४३.६७ टक्के,
यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss