spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

महायुतीने गेमचेंजर ठरून किंगमेकरांचा दावा केला फोल, काही पक्षांचा पराभव…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबरला झाले आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला, ज्यामुळे इतर पक्षांचे किंगमेकर होण्याचे स्वप्न चुरगळले. काही पक्ष आपले प्रचार तंत्र आणि जनतेची आवड ओळखण्यात अयशस्वी ठरले. महायुतीने आश्वासनांची झोड पाडली, तर इतर पक्ष केवळ जुन्या मुद्द्यांवर अडकले. यामुळे किंगमेकर होण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना निवडणुकीत यश मिळवता आले नाही.

 

 

वंचित फॅक्टरला धक्का

वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. २०१९ मध्ये वंचितने मोठा धक्का दिला होता, पण या वेळेस वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही. वंचितने २०० उमेदवार उभे केले होते, पण त्यांचे गणित बिघडले. निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकर ने वंचित बहुजन आघाडी सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत राहणार असे स्पष्ट संकेत दिले होते.

मनसेला एकही जागा नाही; तर बच्चू कडू यांना धक्का

मनसेने या निवडणुकीत मोठ्या अपेक्षांसह १२८ जागांवर लढले होते, पण त्यांना एकही जागा मिळाली नाही. २०१९ मध्ये आलेला आमदारही पराभूत झाला, आणि राज ठाकरे यांच्या मुलाला अमित ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.प्रहार जनशक्ती पक्षाने ३८ जागांवर निवडणूक लढवली होती, पण त्यांना एकही जागा मिळाली नाही. बच्चू कडू यांना त्याच्या निवडणुकीत पराभव झाला.

छोट्या पक्षांना यश

समाजवादी पक्ष आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. इतर छोट्या पक्षांना एक एक जागा मिळाली, ज्यात युवा स्वाभिमानी पक्ष, एमआयएम, शेतकरी आणि कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, राजश्री शाहू विकास आघाडी यांचा समावेश आहे.

Latest Posts

Don't Miss