राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्व उमेदवार, पक्ष प्रचार सभा करत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षाचे नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी टाईम महाराष्ट्राला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा त्यांनी केला आहे.
टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली आहे. त्यांनी “तेजस ठाकरेंकडे तुम्ही काय म्हणून पाहताय? तुमचा एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या समस्येबद्दल, एखाद्या निवडणुकीबद्दल जरा अनॅलिसिस करण्याकडे तुमचा कल असतो. सगळ्या माध्यमांच्या लोकांना आता असं वाटलं होत की, या निवडणुकीमध्ये तेजस ठाकरेंची नियुक्ती होईल. पुन्हा एकदा त्यांना प्लिज वेट असं करण्यात आलं?” असा प्रश्न विचारलं.
त्यावर वरून सरदेसाई यांनी उत्तर दिलं की, असं अजिबात नाही. आज ते पक्ष प्रमुखांचे चिरंजीवी आहे. त्यामुळे त्यांना कोण सांगणार प्लिज वेट? त्यांना जर वाटलं तर त्यांचे स्वागत आहे आणि तेजसला सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी अगदी लहानाचा मोठं होतांना बघितला आहे. त्याचा तो विषय नाही आहे. आज त्याची इच्छा आहे का? हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो आज एक वाइल्ड लाइफ रिसर्चर आहे. तो त्याच्यात अप्रतिम काम करतो. तो तेवढा जबाबदार आहे की तो जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा तो हे सगळ बंद करून एक फॅमिलीला जो काही सपोर्ट लागतो, तो काम करतो. आज सुद्धा उद्धव ठाकरेसाहेब जेवढं महाराष्ट्रभर फिरतायेत, तो त्यांच्या सोबत फिरतो. तो लोकसभेला पण फिरला. आता सुद्धा तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोल्हापूर का कोकणात आहे. त्यांना एक सोबत असावी, एक सपोर्ट असावा, फीडबॅक मिळावं किंवा लोकांचा काय प्रतिसाद आहे. हे सगळं काम तो निवडणूक आल्यावर करतो.
पुढे ते म्हणाले की, त्यामुळे त्याची जर इच्छा झाली तर येईल राजकारणात. असा काही फारसा कल नव्हता की, तू येऊ नकोस असं अजिबात नाही आहे. त्याला वाइल्ड लाइफमध्ये प्रचंड आवड आहे. मी मागे सुद्धा एका मुलाखतीत म्हणालो, मला एकाने विचारले होते की, तेजस ठाकरे जास्त कॅमेरा समोर दिसत का नाहीत? मी म्हंटल १२ महिन्यातून ६ महिने ते जंगलात असतात. तो तिकडे रमतो. त्यांना ती लाईफ जगायला आवडते. त्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे. तो ते फॉलो करतो आणि त्यामध्ये त्याला माहिती आहे. तो जाहिरातीमध्ये इंटरेस्ट घेतो. आपण असं नाही असं केलं पाहिजे किंवा कॅम्पेनमध्ये कुठली हुकलाईन चांगली चालते. लोकांचा एक पल्स ओळखण्यात मला वाटत तो काही वेळेला सांगतो की, बरोबर चाललंय हे पुढे जात रहा किंवा हा मुद्दा नाही होत आहे, असे तो फीडबॅक देतो.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…