spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Vidhansabha Election: राज्यात मतदानाची आकडेवारी किती? कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान..

विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान झाले. एकूण २८८ जागांसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला उत्साहात मतदान झालं. काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेनं मतांचा टक्का वाढलाय असं चित्र आहे. अखेरच्या क्षणी मतदानाने जोर पकडल्याने मतांचा टक्का वाढलाय. ही विधानसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट म्हणजे महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट म्हणजे महाविकास आघाडी यांच्यामध्ये झाली. या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भफत चांगले मतदान झाले. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा उत्साह नसल्याचं कायम असल्याचे दिसले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी उशिरा आली. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे. तर सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्यात झालं आणि सर्वात कमी मतदान कुठे झालं. राज्यभरातील मतदानाची आकडेवारी काय आहे? बघुयात या विडिओ मध्ये.

राज्यभरात 65.11 टक्के मतदान पार पडलं. 2019 मध्ये जवळपास 62 टक्के मतदान झालं होतं. यंदा हा आकडा वाढला असून सायंकाळपर्यंत 65.11 टक्के मतदान झाला आहे. सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापुरात झाली आहे. कोलापुरात 76.25 टक्के मतदान झालाय. या मध्ये सर्वाधिक मतदान करवीरमध्ये झालं तर सर्वात कमी इचलकरंजीमध्ये झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झालाय.
काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, काही ठिकाणी किरकोळ वाद झाला होता. ज्या ठिकाणी अडचणी होत्या तेथे तातडीने पोहोचत प्रक्रिया सुरळीत केली जात होती. प्रशासनाने या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवली होती.

सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले. मुंबई शहराच्या तुलनेने मुंबई उपनगरात मतदानाचा टक्का अधिक दिसून येत आहे. जवळपास सर्व उपनगरांमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून येते. भांडुप पश्चिम या विधानसभेत सर्वाधिक 61.12 टक्के मतदान झालं आहे. तर सर्वात कमी मतदान वर्सोवा या विधानसभेत 51.2% मतदान झाला आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात उच्चाकी मतदान झालं असून येथे 76.25 टक्के मतदान झालं. तर येथील करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान झालं.

राज्यभरातील मतदानाची आकडेवारी ती अशी आहे.

अहमदनगर जिल्यात – 71.73 टक्के
अकोला – 64.98
अमरावती – 65.57
औरंगाबाद – 68.89
बीड – 67.79
भंडारा – 69.42
बुलढाणा – 70.32
चंद्रपूर – 71.27
धुळे – 64.70
गडचिरोली – 73.68
गोंदिया – 69.53
हिंगोली – 71.10
जळगाव – 64.42
जालना – 72.30
कोल्हापूर – 76.25
लातूर – 66.92
मुंबई शहर – 52.07
मुंबई उपनगर – 55.77
नागपूर – 60.49
नांदेड – 64.92
नंदूरबार – 69.15
नाशिक – 67.57
उस्मानाबाद – 64.27
पालघर – 65.95
परभणी – 70.38
पुणे – 61.05
रायगड – 67.23
रत्नागिरी – 64.65
सांगली – 71.89
सातारा – 71.71
सिंधुदुर्ग – 68.40
सोलापूर – 67.36
ठाणे – 56.05
वर्धा – 68.30
वाशिम – 66.01
यवतमाळ – 69.02

तर या मतदानाचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबरला लागणार आहे. तर कोणाची सत्ता येणार, कोणाची सरकार स्थापन होणार, कोणाचा गुलाल उडणार, कोण मुख्यमंत्री होणार या सगळ्या प्रश्नांचं उत्तर २३ नोव्हेंबरला माहिती पडेल.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Latest Posts

Don't Miss